पाच जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

By admin | Published: July 27, 2016 01:29 AM2016-07-27T01:29:25+5:302016-07-27T01:29:25+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील पाच जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजी बोडखे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव

Surrender of five vicious naxalites | पाच जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

पाच जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Next

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पाच जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजी बोडखे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या समक्ष त्यांनी आत्मसमर्पण केले. त्या सर्वांवर मिळून पोलिसांनी एकूण १४ लाखांची बक्षिसे जाहीर केली होती.
आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये चार लाखाचे बक्षीस असलेला प्लाटून क्रमांक ३ सदस्य कालिदास उर्फ रामलाल सरदार हुपुंडी व प्लाटून क्रमांक १५चा सदस्य जागेश उर्फ दुल्लुराम जिटीराम हिडको तसेच प्रत्येकी दोन लाखांचे बक्षीस असलेले गट्टा एरिया सीएनएम टीमचे सदस्य जीवन उर्फ छबीलाल बिपतराम मडावी, सप्लाय टीम सदस्या अंकिता उर्फ जानकी वत्ते पदा व मिलिशीया सदस्य सुखराम लालुराम वड्डे यांचा समावेश आहे. यांच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीला प्रचंड हादरा बसला असल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे.
कालिदास उर्फ रामलाल हुपुंडी हा वडगाव येथील राहणारा असून, तो प्लाटून क्रमांक ३चा सदस्य होता. त्याला तत्कालीन डीव्हीसी दिवाकर याने पोलिसांची भीती दाखवून बळजबरीने दलममध्ये भरती केले होते. सन २००८ ते मार्च २०१३पर्यंत तो नक्षल संघटनेमध्ये कार्यरत होता.
या कार्यकाळात त्याने १४ घटनांमध्ये सहभाग घेतला. जीवन उर्फ छबीलाल बिपतराम मडावी हा धानोरा तालुक्याच्या फुलकोडो गावचा रहिवासी असून, वयाच्या १५व्या वर्षी तो नक्षल दलममध्ये सहभागी झाला. त्याने या काळात दोन गुन्हे केले. जागेश उर्फ दुल्लूराम हिडको हा मोरचूल येथील रहिवासी असून, तोही वयाच्या १५व्या वर्षी नक्षल दलममध्ये भरती झाला. आॅगस्ट २०१५ ते जून २०१६ या काळात त्याने प्लाटून दलम १५चा सदस्य म्हणून काम केले. त्याचा सहा घटनांमध्ये सहभाग होता, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
अंकिता उर्फ जानकी वत्ते ही झारेवाडा (ता. एटापल्ली)
येथील रहिवासी असून, ती नक्षलवाद्यांच्या शस्त्राच्या आकर्षणामुळे दलममध्ये स्वच्छेने भरती झाली. जुलै २०१० ते मार्च २०१२ या काळात ती दलममध्ये कार्यरत होती. तिने गट्टा दलम
कंपनी क्रमांक १०मध्ये काम केले. तिचा सहा घटनांमध्ये सहभाग
होता. सुखराम लालूराम वड्डे हा केहकावाही (ता. धानोरा)
येथील रहिवासी असून, त्याचा दोन घटनांमध्ये सहभाग होता, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

३१ नक्षलवाद्यांचे
२०१६मध्ये आत्मसमर्पण
- २०१६ या वर्षात आतापर्यंत एक नक्षल विभागीय समितीचा सदस्य, एक कमांडर व विविध दलमच्या २९ नक्षल सदस्यांसह तब्बल ३१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे.

Web Title: Surrender of five vicious naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.