अपत्यप्राप्तीसाठीच नक्षली दाम्पत्यांचे आत्मसमर्पण

By admin | Published: June 8, 2014 01:47 AM2014-06-08T01:47:50+5:302014-06-08T01:47:50+5:30

नक्षल दलममध्येच आमची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आम्ही लग्न केले. लग्नानंतर साहजिकच आम्हाला मूल हवे होते.

Surrender of naxalites for offspring | अपत्यप्राप्तीसाठीच नक्षली दाम्पत्यांचे आत्मसमर्पण

अपत्यप्राप्तीसाठीच नक्षली दाम्पत्यांचे आत्मसमर्पण

Next
>गडचिरोली : नक्षल दलममध्येच आमची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आम्ही लग्न केले. लग्नानंतर साहजिकच आम्हाला मूल हवे होते. मात्र नक्षल चळवळीतून त्याला प्रखर विरोध होता. नसबंदीसाठी आमच्यावर दबाव आणला जात होता. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणो सुखी जीवन जगण्यासाठी आत्मसमर्पणाशिवाय आम्हाला दुसरा पर्याय दिसत नव्हता. शेवटी आत्मसमर्पण करायचे ठरविले आणि अखेर अपत्यप्राप्तीसाठी आम्ही दोघांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले, अशी माहिती आत्मसमर्पण करणा:या नक्षली दाम्पत्याने पोलिसांना दिली. 
संदीप ऊर्फ महेंद्र केरामे (26, रा. खुनेरा, जि. राजनांदगाव छत्तीसगड) आणि शीला ऊर्फ लता गोटा (2क् रा. कोरची, जि. गडचिरोली) असे या आत्मसमर्पित नक्षल दाम्पत्याचे नाव आहे. नुकतेच त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. 
चळवळीत काम करताना दोघांची ओळख झाली. हळूहळू त्याचे रूपांतर प्रेमात झाले. उत्तर गडचिरोली-गोंदियाचा डिव्हिजनल कमांडर पहाडसिंगचा अंगरक्षक असलेल्या संदीपने शीलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. शीलानेही होकार दिला. मात्र चळवळीतील नक्षल्यांचा लग्नाला प्रखर विरोध होता. अखेर सहका:यांचा विरोध झुगारून खुद्द पहाडसिंगने जानेवारी 2क्14 मध्ये संदीप आणि शीलाचे लग्न गडचिरोलीच्या जंगलात लावून  दिले. लग्नानंतर मूल व्हावे, अशी संदीप आणि शीलाची इच्छा होती. मात्र नसबंदीसाठी त्यांच्यावर चळवळीतून दबाव येऊ लागला. 
यापूवीसुद्धा चळवळीतील अनेक युवक-युवतींची जबरीने नसबंदी करण्यात आली होती. मात्र आम्हाला मूल पाहिजे होते. अखेर लग्न लावून देणा:या पहाडसिंगनेच आम्हाला आत्मसमर्पणाचा सल्ला दिला, असे या नक्षल दाम्पत्याने स्पष्ट केले.
चळवळीत युवतींना जबरदस्तीने सहभागी करून त्यांचे लैंगिक शोषण करणो ही नित्याचीच बाब झाली आहे. तसेच जबरीने नसबंदी होत असल्यामुळे चळवळीतील युवक- युवतींमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यातच पोलिसांनी नसबंदी शस्त्रक्रिया रिओपन करण्याबाबत तयार केलेले पोस्टर आम्ही पाहिले.
 आत्मसमर्पित नक्षल दाम्पत्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयात नसंबदी शस्त्रक्रिया पुन्हा खुली  केली जाते व त्यांना अपत्याचा लाभ घेता येतो, ही गोष्ट ऐकली होती, असेही या दाम्पत्याने सांगितले. 
 
च्पहाडसिंगने आपल्या चळवळीचा विस्तार करण्यासाठी अनेक तरुण-तरुणींना या हिंसक चळवळीत ओढले. मात्र आपला अंगरक्षक संदीप आणि शीलाचे लग्न लावून दिल्यानंतर त्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करावे, असा सल्ला देणा:या पहाडसिंगने यापूर्वी सुद्धा आपल्या मुलींनी शिकूनसवरून डॉक्टर व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती.  

Web Title: Surrender of naxalites for offspring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.