सेक्शन कमांडरसह नऊ नक्षल्यांचे आत्मसमर्पण
By admin | Published: July 13, 2015 01:14 AM2015-07-13T01:14:07+5:302015-07-13T01:14:07+5:30
सेक्शन कमांडरसह नऊ जहाल नक्षल्यांनी शनिवारी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. एकाचवेळी नऊ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला हादरा बसला.
गडचिरोली : सेक्शन कमांडरसह नऊ जहाल नक्षल्यांनी शनिवारी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. एकाचवेळी नऊ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला हादरा बसला.
या नक्षलवाद्यांमध्ये सेक्शन कमांडर इरप्पा ऊर्फ प्रदीप रामदेव कुजूर (२७), त्याची पत्नी कंपनी सदस्य सिंधू ऊर्फ रासो सोमा गोटा (२६) यांचा समावेश आहे. यातील सात नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले.
चातगाव दलम कमांडर विजय व त्याची पत्नी राधा यांच्या एकत्रित आत्मसमर्पणाने प्रेरीत होऊन कुजुर व सिंधू तसेच रोशन पदा, सुक्की कोरामी यांनी आत्मसमर्पण केले. नक्षल चळवळीत लग्नानंतर पुरुषाला नसबंदी करावी लागते व पती-पत्नींना एकत्रित राहू दिले जात नाही. त्यामुळे नक्षल जोडप्यांमध्ये नैराश्याचे वातावरण असून दलममधील जीवन अधिक त्रासदायक झाले आहे, असे आत्मसमर्पीत नक्षल्यांनी पोलिसांना सांगितले. या सर्व नक्षल्यांवर सुमारे २२ लाखांचे बक्षीस होते, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येत नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारल्याने नक्षल चळवळ हादरली आहे.