नगरपालिकेच्या हद्दीत ३ हजार बोगस मतदारांच्या नोंदी सर्वेक्षणात उघड

By admin | Published: August 24, 2016 01:23 AM2016-08-24T01:23:24+5:302016-08-24T01:23:24+5:30

गेल्या १० वर्षांत नगर परिषदेच्या हद्दीत सुमारे ३ हजार बोगस मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

A survey of 3 thousand bogus voters in the municipal limits revealed in the survey | नगरपालिकेच्या हद्दीत ३ हजार बोगस मतदारांच्या नोंदी सर्वेक्षणात उघड

नगरपालिकेच्या हद्दीत ३ हजार बोगस मतदारांच्या नोंदी सर्वेक्षणात उघड

Next


इंदापूर : गेल्या १० वर्षांत नगर परिषदेच्या हद्दीत सुमारे ३ हजार बोगस मतदारांची नोंद करण्यात आली आहे. त्यांमध्ये ऊसतोड कामगार, परप्रांतीय कामगार व असंख्य इच्छुक नगरसेवकांच्या परगावी राहणाऱ्या लोकांचा समावेश आहे, अशी माहिती काही स्थानिक संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात पुढे आली आहे.
ज्या नगर परिषद कर्मचारी, निवडणूक अधिकाऱ्यांनी या मतदार नोंदणीला अभय दिले, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
दि. ८ ते १९ आॅगस्टदरम्यान शहरातील सर्व १७ प्रभागांतील प्रत्येक प्रभागात दोन कार्यकर्त्यांनी हे सर्वेक्षण केले. मतदार यादीतील ज्या मतदाराच्या नावापुढे घर क्रमांक नाही, ज्या मतदाराचे आडनाव या तालुक्यात कधीही नव्हते अशा आडनावाचे लोक त्यांनी या सर्वेक्षणासाठी निश्चित करण्यात आले होते.
बाहेरगावी असणाऱ्या व रहिवासाचा कुठलाही पुरावा नसणाऱ्या लोकांचा समावेश मतदार यादीत केल्याचे दिसून आले. त्यामध्ये ऊसतोड कामगार, परप्रांतीय कामगार व असंख्य इच्छुक नगरसेवकांच्या परगावी राहत असलेल्या नातलगांचा भरणा होता. (वार्ताहर)
>या मतदारांमुळे मूळ स्थानिक मतदारांचे महत्त्व कमी होते. सत्ताधारी व विरोधी गटांच्या नगरसेवकांकडून दुय्यम वागणूक मिळते, असे सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेचे म्हणणे आहे. ज्या नगर परिषद कर्मचारी, निवडणूक अधिकाऱ्यांनी या मतदार नोंदणीला अभय दिले. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

Web Title: A survey of 3 thousand bogus voters in the municipal limits revealed in the survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.