अंगणवाडी बालकांचे सर्वेक्षण

By admin | Published: September 18, 2016 02:01 AM2016-09-18T02:01:48+5:302016-09-18T02:01:48+5:30

बालकांचे सर्वेक्षण करण्याच्या कामास प्राधान्य देवून कुपोषित बालकांची नव्याने अद्ययावत यादी तयार करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले

Survey of Anganwadi Children | अंगणवाडी बालकांचे सर्वेक्षण

अंगणवाडी बालकांचे सर्वेक्षण

Next

हितेन नाईक,

पालघर- पालघर जिल्ह्यातील अंगणवाड्यामधील सर्व बालकांचे सर्वेक्षण करण्याच्या कामास प्राधान्य देवून कुपोषित बालकांची नव्याने अद्ययावत यादी तयार करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे कुपोषणाबाबत आज बैठक आयोजित करण्यात आली असताना या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आदी उपसाठीत होते.
या बैठकीत कुपोषणाबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश देताना जव्हार, मोखाडा, वाडा व विक्र मगड या तालुक्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांचे दि. १७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०१६ दरम्यान सर्वेक्षण करण्यात यावे. या सर्वेक्षणानंतर तीव्र व अती तीव्र कुपोषित (एमएएम व एसएएम ) बालकांची यादी अद्ययावत करण्यात यावी. ही यादी प्रत्येक दिवशी अंगणवाडी पर्यवेक्षिकांमार्फत संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात यावी. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी उपकेंद्रनिहाय अद्ययावत केलेल्या यादीतील कुपोषित मुलांच्या १०० टक्के तपासणीसाठी उपकेंद्रनिहाय नियोजन करण्यात यावे. आवश्यकतेनुसार इतर तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व तज्ञ वैद्यकीय अधिकारी तसेच इतर
जिल्ह्यातीलही तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवाही याकामी उपलब्ध करून घेण्यात याव्या असे हि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
दि. २२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०१६ या कालावधीत सर्व मुलांची आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत संबंधित उपकेंद्रावर केली जाईल याची दक्षता घेण्यात यावी. या कालावधीमध्ये एखाद्या बालकाची परिस्थिती गंभीर आढळून आल्यास अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांनी त्वरीत ही बाब संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्या निदर्शनास आणने आवश्यक आहे.
संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी त्वरीत सदर मुलांची प्राधान्याने तपासणी करु न उपचार सुरू करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
।सर्व खातेप्रमुखांनाही जुंपले गेले तपासणीच्या कार्याला
जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण ) यांनी स्वत: वैयक्तिकस्तरावर वरील नियोजनाप्रमाणे कार्यवाही होईल याबाबत खबरदारी घ्यावी. हे सर्वेक्षण पूर्ण होण्याच्या अनुषंगाने आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग व आदिवासी विकास विभागातील अधिकारी, कर्मचारी हे सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत सुट्टीच्या दिवशीही हे काम करतील. संबंधित कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या रजा या काळात मंजूर करू नयेत. बालकांचे सर्वेक्षण विहित वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने संबंधित कार्यालय प्रमुख यांनी व्यक्तीश: लक्ष देवून त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. या सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Web Title: Survey of Anganwadi Children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.