पर्जन्यहानीची सवरांकडून पाहणी

By admin | Published: September 24, 2016 03:13 AM2016-09-24T03:13:07+5:302016-09-24T03:13:07+5:30

बोईसर व तारापूर येथील विविध भागाला व रुंद झालेल्या नाल्याला पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी पाहणी केली.

Surveys by Rainfall Surveys | पर्जन्यहानीची सवरांकडून पाहणी

पर्जन्यहानीची सवरांकडून पाहणी

Next


बोईसर : मंगळवारी अतिवृष्टीमुळे आलेल्या पाण्याच्या पूरात नुकसान झालेल्या बोईसर व तारापूर येथील विविध भागाला व रुंद झालेल्या नाल्याला पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी पाहणी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले की नुकसानीचा पूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन निश्चित मदत किती द्यायची या बाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल.
पालकमंत्री सवरा यांनी आज बोईसर येथील सिडको कॉलनी व भीमनगर तर तारापूर येथे संत रोहिदासनगर व मुस्लीम मोहल्ल्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी पालघरचे खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा, डहाणूचे आमदार पास्कल धनारे, पालघरचे तहसिलदार महेश सागर, पालघर जि.प. चे कृषी सभापती अशोक वडे, जिल्हा परीषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रा.पं. सदस्य व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. सिडको कॉलनीतील पूरग्रस्तांनी मंत्र्यांकडे रिडेव्हलपमेंटची मागणी करून नाल्यावरील अतिक्रमणे हटवून नाले रुंदीकरणाची मागणी केली तर भीमनगर येथील पूरग्रस्तांना पालकमंत्री न भेटताच फक्त नाल्याची पाहणी करून निघून गेल्याने तेथील नागरीकांनी नाराजी व्यक्त केली. तर अतिवृष्टीला तीन दिवस उलटूनही मदत न मिळाल्याने पूरग्रस्त मदतीच्या प्रतिक्षेत असून आम्हाला तुटपूंजी मदत नको परीपूर्ण मदत द्या अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, गुरुवारी पदवीधर शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील यांनी भीमनगर तर पालघरचे आमदार अमित घोडा यांनी पास्थळ व तारापूरच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र बोईसरचे आमदार विलास तरे अजून बोईसरला फिरकलेच नाहीत. (वार्ताहर)
>भरपाई द्या पूरग्रस्त घरांची संख्या वाढणार
बोईसर व तारापूर मंडळ (महसूली) क्षेत्रामध्ये एकूण १४७३ घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्य्
रग्रस्त घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पूरामध्ये अन्न-धान्य, कपडेलत्ते, चादरी बिछाने व इलेक्ट्रीक तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह अनेक घरगुती वापरांच्या वस्तूंचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून आम्हाला पूर्ण नुकसान भरपाई त्वरीत द्या, अशी मागणी पूरग्रस्तांकडून होत आहे. तर गोरगरीबांचे अन्नधान्य भिजल्याने त्यांच्यावर संकटाचा डोंगरच कोसळला आहे.
>‘चहा नको रे... नाहीतर पत्रकार म्हणतील पालकमंत्री चहात गुंतले’ बोईसर येथील दौऱ्यात सिडको कॉलनी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर बोईसरच्या भाजपाच्या एका पदाधिकाऱ्यांनी चहाची विनंती केल्यानंतर पालकमंत्री विष्णू सवरा यांनी मिश्किलपणे केले व्यक्तव्य.

Web Title: Surveys by Rainfall Surveys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.