आरपीएफच्या जवानांच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशाचे प्राण
By admin | Published: April 12, 2017 06:51 PM2017-04-12T18:51:57+5:302017-04-12T18:51:57+5:30
मध्य रेल्वेच्या परळ स्थानकावर चालल्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाच्या अंगाशी आली
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये चढण्या उतरण्यासाठी प्रवाशांकडून कमालीची घाई केली जाते. त्यात अनेक प्रवाशांचा जीवही जातो. अशीच घाई मध्य रेल्वेच्या परळ स्थानकावर चालल्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाच्या अंगाशी आली. दैव बलवत्तर म्हणून आरपीएफच्या जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले.
परळ स्थानकावर घडलेला हा प्रसंग सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. परळ स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. मात्र या प्रयत्नात त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. पण तेथे ड्युटीवर असलेल्या आरपीएफच्या जवानांनी प्रसंगावाधान दाखवले आणि या तरुणाला प्लॅटफॉर्मच्या कडे पासून दूर खेचले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असून, लोकलमध्ये चढता उतरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पाहा व्हिडिओ -
#WATCH: Two Railway Protection Force (RPF) constables save a commuter from being run over by local in Mumbai"s Parel railway station. pic.twitter.com/mLbWT60qkb
— ANI (@ANI_news) April 12, 2017