एसटीचालकाच्या प्रसंगावधानामुळे बचावले ७६ प्रवाशांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 12:59 AM2018-11-10T00:59:11+5:302018-11-10T00:59:54+5:30

भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटातील महाडच्या हद्दीतील दुसऱ्या अरुंद वळणावर एसटीचे वळण पूर्णपणे न बसल्याने बस खोल दरीत कोसळता कोसळता वाचली.

 The survivors of 76 passengers escaped | एसटीचालकाच्या प्रसंगावधानामुळे बचावले ७६ प्रवाशांचे प्राण

एसटीचालकाच्या प्रसंगावधानामुळे बचावले ७६ प्रवाशांचे प्राण

Next

भोर : भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटातील महाडच्या हद्दीतील दुसऱ्या अरुंद वळणावर एसटीचे वळण पूर्णपणे न बसल्याने बस खोल दरीत कोसळता कोसळता वाचली. चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील ७६ प्रवाशांचे प्राण वाचले. अन्यथा बस सुमारे दीड ते दोन हजार फूट खोल दरीत पडून मोठा अनर्थ घडला असता. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घडली.
मोहन उत्तमराव बांदल (वय ५४, रा. महुडे बुद्रुक, ता. भोर) असे चालकाचे नाव आहे. भोर आगाराची बस (एमएच १४ बीटी ३८४७) शुक्रवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास स्वारगेट येथून महाडला जाण्यास निघाली. बसमध्ये सुमारे ७६ प्रवासी होते. ही बस भोर आगारातून महाडच्या दिशेने निघाली होती. वरंध घाटातील वाघजाईदेवी मंदिराच्या पुढील बाजूला महाड तालुक्याच्या हद्दीतील दुसºया तीव्र उताराच्या व अरुंद असलेल्या वळणावर बस आली. एका बाजूला चारी काढलेली आणि दुसºया बाजूला खोल दरी त्यामुळे चालकाला व्यवस्थित वळण घेता आले नाही. समोरचा कठडाही कमी उंचीचा असल्याने गाडी खाली गेल्यास सुमारे दीड ते दोन हजार फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे चालकाच्या अंगावर काटा उभा राहिला होता.

घाटरस्ता धोकादायकच
प्रसंगाचे भान ठेवत चालकाने गाडी कठड्याजवळ थांबविली. तत्काळ गाडीतील ७६ प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. भोर-महाड हा रस्ता अत्यंत अरुंद असून वरंध घाटात अनेक धोकादायक वळणे आहेत. अनेक ठिकाणी संरक्षक कठडे नाहीत. दिशादर्शक फलक नाहीत. झाडेझुडपे वाढलेली आहेत. यामुळे वळणावरच्या गाड्या दिसत नाहीत.

Web Title:  The survivors of 76 passengers escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.