पालिका शाळांमध्ये सुर्यनमस्काराची सक्ती

By admin | Published: August 23, 2016 09:49 PM2016-08-23T21:49:31+5:302016-08-23T21:49:31+5:30

स्फूर्ती निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये सुर्यनमस्कार सक्तीचा करण्याची ठरावाची सुचना पालिकेच्या महासभेत आज बहुमताने मंजूर करण्यात आली़

Suryanamsa's compulsions in municipal schools | पालिका शाळांमध्ये सुर्यनमस्काराची सक्ती

पालिका शाळांमध्ये सुर्यनमस्काराची सक्ती

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २३ : विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये सुर्यनमस्कार सक्तीचा करण्याची ठरावाची सुचना पालिकेच्या महासभेत आज बहुमताने मंजूर करण्यात आली़ समाजवादी पक्षाने या सुचनेला आव्हान देत उर्दू शाळांमध्ये सलाम वालेकुम बोलू, असे ठणकावले़ सर्वच विरोधी पक्ष भाजपाविरोधात उभे ठाकले़ मात्र या वादळी चर्चेवेळी बघ्याच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेने मतदानावेळी युती धर्म पाळला़  पालिकेच्या शाळांमध्ये रोज सकाळी प्रार्थनेवेळी योगा व त्यात विशेषत सुर्यनमस्कार सक्तीचा करावा, अशी ठरावाची सुचना भाजपाच्या नगरसेविका समिता कांबळे यांनी ठेवली होती़ मात्र या सुचनेविरोधात आवाज उठविण्यासाठी समाजवादी पक्षाने सर्वच विरोधी पक्षांना साकडे घातले होते़ युतीमधील दुफळीचा लाभ उठविण्यासाठी शिवसेनेलाही यात सामील होण्याचे आवाहन समाजवादी पक्षाने केले होते़.

त्यानुसार विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी पालिका शाळांमध्ये सुर्यनमस्कार ऐच्छिक असावा, अशी उपसुचना मांडली़ या उपसुचनेला मनसे आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला़ समाजवादी पक्षाने मात्र सुर्यनमस्कार नकोच, अशी भूमिका घेतली़ सुर्यनमस्कार सक्तीचा केल्यास आम्ही उर्दू शाळांमध्ये सलाम वालेकुम सुरु करु, असा इशारा दिला़ मात्र भाजपाने यावर मतदान घेतले़ यात शिवसेनेने मित्रपक्षालाच साथ दिल्यामुळे ही सुचना मंजूर झाली़  १७७ देशांमधील शाळांमध्ये योगा सक्तीचे आहे़ यापैकी ४७ हे मुस्मिल धर्मिय देश आहेत़

भाजपाचा दावा़

पालिका शाळांमध्ये सुर्यनमस्कार ऐच्छिक असावा, ज्या विद्यार्थ्यांना सुर्यनमस्कार करायचा असेल, ते करतील़ विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तक अशा सुविधा वेळेत मिळतात का, यावर चर्चा करावी़
काँग्रेसची भूमिका़विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा

- पालिका शाळांमध्ये सुर्यनमस्कार सक्तीचा केल्यास उर्दू शाळांमध्ये सलाम वालेकुम आणि मुस्लिम धर्मिय प्रार्थना सुरु करु़
समाजवादीचे गटनेते रईस शेख

- सुर्यनमस्काराचा निर्णय मुलांवर थोपू नका़ ऐच्छिक करावा़ मनसे गटनेते संदीप देशपांडे

शिवसेनेने पाळला युती धर्म
शिवसेनेचे महत्वकांक्षी प्रकल्पाला भाजपाने सुरुंग लावायचा आणि भाजपाची स्वप्न शिवसेनेने भंग करायची, असा खेळ गेले वर्षभर सुरु आहे़ या ठरावाच्या सुचनेबाबतही शिवसेनेने ठोस भूमिका घेतली नव्हती़ मात्र मतदानावेळी शिवसेनेने भाजपाच्या बाजुने कौल दिला़ त्यामुळे ही ठरावाची सुचना मंजूर झाली आहे़ ही सुचना पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येईल़ त्यानंतर आयुक्त ही सुचना राज्य सरकारकडे पाठवतील़ मात्र सत्ता भाजपाची असल्याने त्यावर शिक्कामोतर्ब होण्याची दाट शक्यता आहे़

विरोधी पक्षांचा सभात्याग
भाजपाच्या या मनमानी कारभाराला विरोध करीत विरोधी पक्षांनी अखेर मतदानानंतर सभात्याग केला़

पालिकेच्या ११०० शाळा असून यामध्ये सुमारे चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़

Web Title: Suryanamsa's compulsions in municipal schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.