अखेर सूर्याचा वसई विरारचा जुन्या जलवहिनीचा पाणीपुरवठा २४ तासांनी पूर्ववत!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 07:27 PM2021-09-04T19:27:34+5:302021-09-04T19:28:06+5:30
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरई फाटा जवळ जलवाहिनीला गळती होऊन लाखो लिटर पाणी गेले होते वाया!
आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क
वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरई फाटा येथे गुरुवार (दि.2 ) सप्टेंबर रोजी संध्याकाळी उशिरा सुर्याची जुनी जलवाहिनी फुटल्याने तिच्या दुरुस्तीचे काम वसई विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाने शनिवारी सकाळी 9 30 वाजता हाती घेत ते जवळपास 8 तासांच्या अथक प्रयत्नाने शनिवारी संध्याकाळी 5 वाजता पूर्ण केले. मात्र, त्यावरील सिमेंट कोब्यामुळे सूर्याचा जुन्या वाहिनीचा वसई विरारचा पाणीपुरवठा शनिवारी सकाळी म्हणजेच 24 तासांनी सुरळीत व पूर्ववत करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रकाने लोकमतला दिली.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरई फाटा जवळ जुन्या मोठ्या जलवाहिनीला मोठी गळती होऊन लाखो लिटर पाणी गुरूवारी संध्याकाळ पासूनच वाया गेले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला तक्रार केल्यावर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गानी धाव घेत रात्री शक्य नसल्याने शुक्रवारी सकाळी 9 30 वाजता तिच्या दुरुस्तीचे काम सुरू केलं होतं व हे काम 5 वाजता पुर्ण झालं
दरम्यान या दुरुस्तीच्या काळात वसईतील पाणीपुरवठा हा नवीन जलवाहिनी मधूनच सुरू होता मात्र आता शनिवारी सकाळी जवळपास 24 तासांच्या अथक प्रयत्न करत हे काम पूर्ण झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. या दुरुस्ती बाबत बोलताना नियंत्रकांनी सांगितले की,वराई फाटा जवळ जुन्या जलवाहिन्याचे मोठाले पाईप होते तिथे पाईप जोडुनजलवाहिनी पुन्हा नादुरुस्त होऊ नये यासाठी त्यावर सिमेंटचा कोबा करण्यात आला आणि अखेर शनिवारी सकाळनंतर सुर्याच्या दोन्ही जलवाहिनीतुन वसईतील पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू करण्यात आला आहे