"...तर ते तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील"; सुषमा अंधारेंची लेकीसाठी भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 11:13 AM2022-11-14T11:13:04+5:302022-11-14T11:13:40+5:30

Sushama Andhare : सुषमा अंधारे यांनी आपल्या लेकीसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Sushama Andhare emotional facebook post over dear daughter | "...तर ते तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील"; सुषमा अंधारेंची लेकीसाठी भावनिक पोस्ट

"...तर ते तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील"; सुषमा अंधारेंची लेकीसाठी भावनिक पोस्ट

googlenewsNext

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्या विभक्त पतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धडाडीचे नेतृत्व असून सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याची भूमिका असल्याने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. माझी राजकीय पार्श्वभूमी नाही पण सामाजिक कार्य करत आलोय. आमचे नेते एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती पार पाडू असं विधान वकील वैजनाथ वाघमारे यांनी केले आहे. यानंतर आता सुषमा अंधारे यांच्या एका फेसबुक पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे. 

सुषमा अंधारे यांनी आपल्या लेकीसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. "बाळा,  तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तूझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी  लढायचं ठरवलंय..!" असं म्हणत लेकीचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच "जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील.. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत. तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील..!" असं देखील म्हटलं आहे. 

सुषमा अंधारेंची फेसबुक पोस्ट

"प्रिय कब्बु,
तू फक्त 45 दिवसांची होती तेव्हाचा हा फोटो आहे.  मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं..  बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचं होतं आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता. 
पण अख्ख कुटुंब पाठीशी उभा राहिलं.. विशालमामाने अत्यंत प्रेमाने तुला पोटाशी धरलं अन् मला एकटीला निरोप दिला. दुबईत दोन तास बोलुन मी आल्या पावली घारीसारखी तुझ्याकडे झेपावले. 
बाळा,  तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तुझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी  लढायचं ठरवलंय..! 
तुला याचा अर्थ किती समजेल हे आत्ता सांगता येणार नाही पण तरीही आपल्या पाच-पन्नास पिढ्यांना ज्यांनी नवा मार्ग दाखवला ते बाबासाहेब इथल्या पितृसत्ताक आणि मनुवादी व्यवस्थेबद्दल बोलताना फार चांगलं विश्लेषण करतात,. 
बाबासाहेब लिहितात, " जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील.. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत.  त्यांच्या धाक दपटशा  आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील.  तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील.
पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील..! 
भय , भ्रम , चरित्र हत्या हि मनुवादी अस्त्र आहेत यांच्यापासून सावध राहा " _ डॉ बाबासाहेब आंबेडकर 
#आई #लढा"

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Sushama Andhare emotional facebook post over dear daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.