sushant death case : रिया चक्रवर्ती, तिच्या भावाला केव्हाही होऊ शकते अटक, ड्रग पेडलरशी थेट संबंध असल्याचे उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 09:42 PM2020-09-01T21:42:46+5:302020-09-01T21:47:50+5:30
एनसीबीने सोमवारी मुंबईत दोन जणांना अटक केली. या दोघाची चौकशी केली असता, त्यांचे रिया आणि तिच्या भावाशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे.
मुंबई - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सोमवारी एक मोठी गोष्ट समोर आली. या प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यापासूनच रिया आणि तिच्या भावावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तसेच, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोदेखील या प्रकरणाचा अत्यंत गाभीर्याने तपास करत आहे. एनसीबीने सोमवारी मुंबईत दोन जणांना अटक केली. या दोघाची चौकशी केली असता, त्यांचे रिया आणि तिच्या भावाशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे.
रियाला जामीन मिळू नये यासाठी, एनसीबी रियाविरोधात आणखी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. टाइम्स नाउने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीशी संबंधित लोकांनी म्हटले आहे, की टीमने ज्या आरोपीला अटक केली आहे, त्याच्या सोबत रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचे थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. यामुळे रिया आणि तिच्या भावालाही तत्काळ अटक केली जाऊ शकते.
बॉलीवुडमधील अनेक नामवंत चेहऱ्यांचा ड्रग पेडलरशी सबंध -
अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलर्सच्या चौकशीतून रिया आणि तिच्या भावा शिवाय, बॉलीवुडमधील अनेक मोठ्या लोकांची नावे समोर आली आहेत. एनसीबी लवकरच ही नावेही जाहीर करण्याची शक्यता आहे. संबंधित वृत्तानुसार, वांद्रे, जुहू आणि लोखंडवाला भागांत होणाऱ्या बॉलिवुड पार्टीजमध्ये ड्रग्स घेतले जाते, असे ड्रग पेडलर्सनी सांगितले. रियावरही ड्रग्सचा वापर करणे आणि डीलिंग' करण्याचा आरोप आहे.
#Breaking | Huge breakthrough in alleged B-Town drug expose: Arrested accused has a direct link with Rhea and her brother Showik (NCB sources).
— TIMES NOW (@TimesNow) September 1, 2020
Siddhant with more details. pic.twitter.com/eDg2arzvQ3
सीबीआयकडून रियाचीही चौकशी सुरूच -
सीबीआयकडून रियाची चौकशी सातत्याने सुरूच आहे. सीबीआयच्या पथकाने रविवारी जवळपास नऊ तास तिची चौकशी केली, यापूर्वी शनिवारी सात तास चौकशी चालली. तर शुक्रवारीही जवळपास दहा तास तिची चौकशी सुरू होती. आता सीबीआय गुरुवारपासून रियाचा भाऊ शौविकची चोकशी करणार आहे. तत्पूर्वी मुंबई पोलिसांनीही रियाची चोकशी केली होती. याशिवाय अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) अभिनेत्री रियाची चौकशी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या -
IndiaChinaTension : NSA अजीत डोवाल अॅक्शन मोडमध्ये, वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली बैठक
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप
चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया
लडाखमधील वादाच्या आड देशातील उपासमार लपवतोय चीन, 1962 मध्येही होती अशीच स्थिती
प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पंचत्वात विलीन