सुशांत राजपूत-दिशा सालियान मृत्यूचं कनेक्शन; नव्या दाव्यावर मंत्री शंभुराज देसाई स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 01:38 PM2022-12-26T13:38:28+5:302022-12-26T13:38:57+5:30

पोस्टमोर्टमवेळी असणाऱ्या माणसानं पुढे येऊन जे काही सांगितले. या सगळ्या गोष्टींची पडताळणी करायला हवी असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं.

Sushant Rajput-Disha Salian Death Connection; Minister Shambhuraj Desai spoke clearly on the new claim | सुशांत राजपूत-दिशा सालियान मृत्यूचं कनेक्शन; नव्या दाव्यावर मंत्री शंभुराज देसाई स्पष्टच बोलले

सुशांत राजपूत-दिशा सालियान मृत्यूचं कनेक्शन; नव्या दाव्यावर मंत्री शंभुराज देसाई स्पष्टच बोलले

googlenewsNext

नागपूर - सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणी त्यावेळी काही गोष्टी समोर आल्या नव्हत्या. सुशांत आणि दिशा हत्येचं कुठेतरी कनेक्शन आहे. त्यावेळी तपास करताना कुणाच्या तरी दबावामुळे, हस्तक्षेपामुळे काही गोष्टी समोर आल्या नसतील त्या आता पुढे येत आहेत तर याचा तपास होणं गरजेचे आहे असं सांगत मंत्री शंभुराज देसाई यांनी कूपर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याने केलेल्या दाव्यावर स्पष्ट भाष्य केले आहे. 

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, पोस्टमोर्टमवेळी असणाऱ्या माणसानं पुढे येऊन जे काही सांगितले. या सगळ्या गोष्टींची पडताळणी करायला हवी. यातील सत्य बाहेर काढणे. वस्तूस्थिती समोर येणे गरजेचे आहे. निश्चित आमचे पोलीस हे फॅक्ट समोर आणतील असा विश्वास आहे. जी यंत्रणा तपास करतेय त्या आता नवनवीन बाबी, विधानं समोर येतायेत त्या सगळ्या रेकॉर्डवर घेतील. खूनाच्या, आत्महत्येच्या केसमध्ये कसा संदर्भ लागतील ते पाहतील. तपास यंत्रणा सर्व वस्तूस्थिती समोर येतील. ज्या गोष्टी आधी लपल्या होत्या त्या आता समोर यायला लागल्या आहेत असं त्यांनी सांगितले. 

काय होता दावा?
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता कूपर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यानं नवा खुलासा केला आहे. सुशांतच्या मृतदेहावर मुका मार लागल्याच्या खूणा होत्या. हा मृतदेह आत्महत्येचा नसून हत्येचा असल्याचं वरिष्ठांना सांगितलं परंतु माझं काम मी करतो, तुझं काम तू कर. माझं काम केवळ पोस्टमोर्टम करणं आणि मृतदेह शिवणे हेच होते. दीड दोन तास पोस्टमोर्टम झालं. त्याचं व्हिडिओग्राफी केली नाही फक्त फोटोग्राफी केली असं कर्मचारी रुपकुमार शाह यांनी म्हटलं. 

रुपकुमार शाह यांनी सांगितले की, सुशांत सिंह हा खूप मोठा अभिनेता होता. त्याच्यासारख्या माणसाने आत्महत्या केल्यानं याकडे निरखून बघणं आमचं काम आहे. मी २८ वर्षात ५०-६० मृतदेहाचं पोस्टमोर्टम केले आहे. सुशांतचा मृतदेह पाहिल्यावर ही हत्या असल्याचं दिसलं. हातापायाला मार लागलेला माणूस गळफास लावून घेऊ शकत नाही. सुशांतने आत्महत्या केली असावी हे मला पटलं नाही. मी वरिष्ठांना कळवलं. तेव्हा केवळ पोस्टमोर्टम करून द्या असं काम होतं ते करून दिले असं त्यांनी म्हटलं. टीव्ही ९ च्या मुलाखतीत शाह यांनी हा दावा केला आहे. मृत्यू संशयास्पद असल्याचं मृतदेहाच्या पोस्टमोर्टमवेळी व्हिडिओग्राफी केली जाते. सुशांतच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करण्यावेळी पूर्णवेळ मी तिथेच होतो. पोस्टमोर्टमवेळी २ महिला आणि ३ पुरुष डॉक्टर होते. आमच्यात संभाषण झालं होते. ही हत्या असल्याची चर्चा झाली. तेव्हा तुम्ही तुमचं पोस्टमोर्टमचं काम करा. आम्ही अहवाल बनवतो असं डॉक्टरांनी म्हटलं. त्याप्रमाणे आम्ही मृतदेहावर पोस्टमोर्टम केले. जे काही नमुने होते ते पोलिसांकडे सुपूर्द केले असं रुपकुमार शाह यांनी सांगितले. 
 

Web Title: Sushant Rajput-Disha Salian Death Connection; Minister Shambhuraj Desai spoke clearly on the new claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.