सुशीलकुमारने परदेशात पाठवले आठ कोटींचे इफेड्रीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2016 09:26 PM2016-08-22T21:26:00+5:302016-08-22T21:26:00+5:30

शिपिंग कंपनीचा संचालक सुशीलकुमार असिकन्नन याने सुमारे आठ ते १२ कोटींचे सुमारे २०० ते ३०० किलो इफे ड्रीन परदेशात पाठवल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

Sushil Kumar sent eight crore EPIDEN abroad | सुशीलकुमारने परदेशात पाठवले आठ कोटींचे इफेड्रीन

सुशीलकुमारने परदेशात पाठवले आठ कोटींचे इफेड्रीन

googlenewsNext

जितेंद्र कालेकर

ठाणे, दि. २२ : शिपिंग कंपनीचा संचालक सुशीलकुमार असिकन्नन याने सुमारे आठ ते १२ कोटींचे सुमारे २०० ते ३०० किलो इफे ड्रीन परदेशात पाठवल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. तो वेशांतर करून ठाण्यासह देशभरातील पोलिसांना गेल्या चार महिन्यांपासून चकवा देत होता. त्याला बेंगलोर येथून ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून सात मोबाइल, आठ सीमकार्ड आणि दोन एटीएमकार्ड अशी सामग्री हस्तगत केली आहे. त्याला ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. सोलापुरातील सुमारे अडीच हजार कोटी तसेच गुजरातमधील १३०० किलोच्या इफे ड्रीन तस्करीप्रकरणी ठाणे आणि गुजरात पोलीस त्याच्या मागावर होते.

तो बेंगलोरमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक आयुक्त भरत शेळके आणि अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल वालझडे, विठ्ठल करंजुले आणि हवालदार शशिकांत निंबाळकर यांच्या पथकाने बेंगलोरच्या एअरपोर्ट रोड येथून रविवारी सायंकाळी ६ वा.च्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. एअरपोर्ट रोडवर तो मिळाल्यामुळे तो परदेशात जाण्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. चौकशीनंतर सोमवारी सकाळी त्याला अटक केल्याची माहिती सहायक आयुक्त शेळके यांनी दिली.

एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रा.लि. या सोलापूरच्या कंपनीचा तत्कालीन संचालक मनोज जैन, सल्लागार पुनीत श्रींगी आणि शिपिंग कंपनीतील हरदीप गिल यांच्या अटकेनंतर नवी मुंबईच्या खांदेश्वर भागात राहणारा सुशीलकुमार पसार झाला होता. मुंबईतील एका बँकेत त्याची पत्नी अधिकारी असून तिच्याशीही त्याचा संपर्क नव्हता. त्याचा अटकपूर्व जामीन ठाणे न्यायालयाने फेटाळल्यानंतर तो बेंगलोर, तामिळनाडू, चेन्नई आदी शहरांमध्ये वेशांतर करून वास्तव्य करीत होता. त्याला ताब्यात घेतले, तेव्हा त्याने केसांनाही आर्मी कट देऊन तसाच पेहराव केला होता. त्याने एव्हॉनमधून काढलेले २०० ते ३०० किलोचे इफे ड्रीन परदेशात पाठवले आहे.

तर, काही माल विदेशात पाठवण्याच्या नावाखाली गुजरातसह इतर ठिकाणी तस्करी केल्याची माहिती तपासात उघड होत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या अटकेमुळे यातील अटक आरोपींची संख्या आता ११ झाली असून आणखी सात फरारींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

सुशीलकुमारने ड्रगमाफिया विकी गोस्वामीबरोबर आणखी कोणत्या ठिकाणी तस्करी केली. तसेच त्याने नवी मुंबईसह आणखी कुठे माल ठेवला आहे, याचा तपास सुरू आहे. त्याचे घर तसेच इतर ठिकाणी झडती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यांचा शोध सुरूच... इफे ड्रीनप्रकरणी आता ११ आरोपींना अटक केली असली तरी आता ड्रगमाफिया विकी गोस्वामी, किशोर राठोड, किशोरचा साथीदार भरत काठिया, डॉ. अब्दुल्ला आणि त्याचे दोन साथीदार अशा सात फरारींचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Sushil Kumar sent eight crore EPIDEN abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.