सुशीलकुमार शिंदे यांना डी.लिट पदवी प्रदान
By Admin | Published: April 26, 2017 02:32 PM2017-04-26T14:32:18+5:302017-04-26T14:32:18+5:30
ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 26 - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर विद्यापीठाच्या वतीने डी. लिट ही सन्मानाची ...
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 26 - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर विद्यापीठाच्या वतीने डी. लिट ही सन्मानाची पदवी राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. बुधवारी विद्यापीठात हा सोहळा पार पडला. यावेळी राज्यपालांनी शिंदे यांच्यासाठी प्रोटोकॉल मोडून भाषण केले.
चहा विक्री करणारा देशाचा पंतप्रधान होतो, लहानपणी पेपर टाकणारे ए.पी.जे. अब्दुल कलाम हे राष्ट्रपती झाले आणि सुशीलकुमार शिंदे यांनी तर शून्यातून विश्व निर्माण केले, असे सांगत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी शिंदे यांचा सन्मान केला.
शिंदे यांनी कला, साहित्य, संगीत, नाट्य, सामाजिक उभारणी, राष्ट्रीय विकास तसेच सामाजिक, राजकीय सुधारणा आदी क्षेत्रांसाठी विधायक कार्य केले आहे. युवापिढीला रोजगार देणे यासारखी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. भारतातील एक मुत्सद्दी नेता म्हणून तसेच संयुक्त राष्ट्रसंघात देशाचे प्रतिनिधित्व करून त्यांनी केलेले कार्य अनमोल आहे, असे शिंदे यांच्या प्रती कौतुकाचे उद्गार कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी काढले होते. शनिवारी या सोहळ्याबाबत माहिती देताना त्यांनी शिंदेचे कौतुक केले होते.
https://www.dailymotion.com/video/x844w6g