सुशिलकुमार शिंदे म्हणतात, युवकांनो इंटरकास्ट मॅरेज करा
By Admin | Published: July 1, 2016 08:59 PM2016-07-01T20:59:08+5:302016-07-01T20:59:08+5:30
महात्मा बसवेश्वर हे इंटरकास्ट मॅरेजचे प्रणेते आहेत़. बाराव्या शतकात त्यांनी वीरशैव कक्कय्याचा विवाह एका ब्राम्हणयुवतींशी करून दिला होता़. त्यामुळे युवकांनो इंटरकास्ट मॅरेज
सोलापूर : महात्मा बसवेश्वर हे इंटरकास्ट मॅरेजचे प्रणेते आहेत़. बाराव्या शतकात त्यांनी वीरशैव कक्कय्याचा विवाह एका ब्राम्हणयुवतींशी करून दिला होता़. त्यामुळे युवकांनो इंटरकास्ट मॅरेज करा, मुलींचा शोध घ्या, पण जीवनभर साथ देणारी असावी़, माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे हे उदगार दाद घेऊन गेले़.
सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ़ इरेश स्वामी यांच्या बसवबोध या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले़. त्यावेळी ते बोलत होते़ पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी समतेचा संदेश दिला़. जातीभेद दूर करून समाजात क्रांती घडवून आणली़. त्यातून त्यांनी आंतरजातीय विवाहांनाही प्रोत्साहान दिले़. यावेळी शिंदे यांनी स्वत:च्या विवाहाचा किस्साही ऐकावला़ मी जातीने वीरशैव कक्कय्या (ढोर) अन माझी पत्नी कायस्थ़ आम्ही दोघांनी असाच आंतरजातीय विवाह केला़. पन्नास रूपयात हा नोंदणी विवाह झाला आहे़. अन आमचा संसार सुरू झाला़...शिंदे सांगत होते़.