जम्मू- काश्मीरहून सुखरूप घरी परतलेल्या रुपाली ठोंबरेंना पाहून सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:33 IST2025-04-24T13:31:02+5:302025-04-24T13:33:08+5:30
Sushma Andhare: शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन रुपाली ठोंबरे आणि त्यांच्या कुटुंबाचे पुणे विमानतळावर स्वागत केले.

जम्मू- काश्मीरहून सुखरूप घरी परतलेल्या रुपाली ठोंबरेंना पाहून सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या!
जम्मू- काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या कुटुंबांसोबत पर्यटनासाठी गेल्या होत्या. सुदैवाने त्या आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित घरी परतल्या आहेत. शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन रुपाली ठोंबरे आणि त्यांच्या कुटुंबाचे पुणे विमानतळावर स्वागत केले. यावेळी सुषमा अंधारे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सुषमा अंधारे या रुपाली ठोंबरे यांच्या गळ्यात पडून रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जम्मू- काश्मीरच्या पहलगाम येथे बुधवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला. ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा रुपाली ठोंबरे आपल्या कुटुंबासोबत जम्मू- काश्मीरमध्येच होत्या. मात्र, आता त्या सुखरूप घरी पोहचल्या आहेत. दरम्यान, रुपाली ठोंबरे आपल्या कुटुंबासोबत पुणे विमानतळावर पोहोचल्या असता सुषमा अंधारे यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना मिठी मारली. यावेळी सुषमा अंधारे भावूक झाल्या आणि रुपाली ठोंबरे यांच्या गळ्यात पडून रडल्या, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
हा काय प्रकार आहे ??? 🤨 pic.twitter.com/zBlqvqNObH
— Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) (@jogalshailaja) April 24, 2025
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे बुधवारी २.३० वाजताच्या सुमारास दोन-तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांची ओळखपत्रे तपासण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांनी लोकांना त्यांची नावे विचारली आणि नंतर त्यांना गोळ्या घालून ठार मारले. ही संपूर्ण घटना जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील बैसरणा येथे घडली. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर, पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. अतुल मोने (डोंबिवली), संजय लेले (डोंबिवली), हेमंत जोशी (डोंबिवली), संतोष जगदाळे (पुणे), कौस्तुभ गणबोटे (पुणे) आणि दिलीप देसले (पनवेल) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.