Maharashtra Politics: “माझ्यावर आरोप करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे!”: सुषमा अंधारे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 01:17 PM2022-12-25T13:17:13+5:302022-12-25T13:18:09+5:30
Maharashtra News: मोहन भागवत सांप्रदायाचे वारकरी , कीर्तनकार, प्रहसनकार आहेत पेड कीर्तनकार आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड अशी ओळख असलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अलीकडेच संत, वारकरी, वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या विधानांचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहे. यासंदर्भात सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याविरोधात राज्यभर गुन्हे दाखल केले जाणार आहे. यातच आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि क्लिपबाबत सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजत नाही की, भाजपच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचा पर्यायने देवेंद्र फडणवीस यांचा ट्रॅप आहे की, ४० आमदार भाजपमध्ये घ्यायचे. भाजप वाढवायचा. थेट मोदींच्या पंतप्रधान पदावर दावा ठोकून कधी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील. हे कळणार नाही. अशी खोचक टिप्पणी सुषमा अंधारे यांनी पंढरपुरात केली. तसेच सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे माझे भाऊ आहेत, ते थोडेसे चुकलेत रांगडा भाऊ आहेत त्यांच्याशी बोलून त्यांना समजावून सांगण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.
माझ्यावर आरोप करणारे मोहन भागवत संप्रदायाचे!
तसेच माझ्यावर टीका करणारे कीर्तनकार वारकरी सांप्रदायिक हे खरे वारकरी आहेत तर ते मोहन भागवत सांप्रदायाचे वारकरी , कीर्तनकार, प्रहसनकार आहेत पेड कीर्तनकार आहेत. पंधरा वर्षानंतर ती क्लिप व्हायरल कारण आता काही प्रश्न विचारले जातात त्याचे उत्तर त्यांना देता येत नाहीत, अशी टीका वारकरी संप्रदायाच्या आंदोलनावर अंधारे यांनी केली. तसेच पंतप्रधान मोदी हिंदुत्ववादी नाहीत हे सुब्रमण्यम स्वामींचे वक्तव्य गांभीर्यपूर्वक आणि विचार करण्यासारखे आहे. कारण स्वामी हे भाजपचे जुने जाणते नेते आहेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"