“शंभुराज देसाईंच्या धमकीला घाबरत नाही, तुमच्या नोटिसा डायपरसाठी वापरू”; सुषमा अंधारे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 04:54 PM2024-06-27T16:54:08+5:302024-06-27T16:55:00+5:30

Sushma Andhare News: आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला.

sushma andhare criticizes shambhuraj desai over pune pub and drugs issue | “शंभुराज देसाईंच्या धमकीला घाबरत नाही, तुमच्या नोटिसा डायपरसाठी वापरू”; सुषमा अंधारे आक्रमक

“शंभुराज देसाईंच्या धमकीला घाबरत नाही, तुमच्या नोटिसा डायपरसाठी वापरू”; सुषमा अंधारे आक्रमक

Sushma Andhare News: गेल्या काही दिवसांत पुण्यात ड्रग्ज प्रकरण, अनधिकृत पब यासह अवैध धंदे समोर येत आहेत. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल सुरू आहे. यातच आता मंत्री शंभुराज देसाई यांच्या धमकीला घाबरत नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. 

पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की,  पुणे विद्येचे माहेरघर म्हटले जाते. पण आता याच पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा भोजवारा उडाला आहे. पब बारच्या संस्कृतीने सगळ्या तरुणाईला विळखा टाकलेला आहे. पुण्यात फक्त अधिकृत २३ पब बार आहेत. मग बाकीचे १०० पब बार कोणाच्या आशीर्वादने चालतात, असा थेट सवाल करत, शंभुराज देसाई तुमच्या धमकीला मी घाबरत नाही.  तुमच्या नोटिसा आम्ही डायपरसाठी वापरू, कुठल्या तोंडाने तुम्ही नोटिसा पाठवत आहात, आम्ही मागील १० महिन्यांपासून ड्रग्जच्या विरोधात आवाज उठवत आहोत. मग कारवाई का होत नाही, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी यावेळी केली. 

पुण्यातील पब बार माहिती आमच्याकडे आहे 

पुण्यातील पब बार माहिती आमच्याकडे आहे. शंभुराज देसाई मंत्री म्हणून तुम्ही काय काम करता? चरणसिंग राजपूत या भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्याचे निलंबन करून चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी अंधारे यांनी यावेळी केली.  शंभुराज देसाई तुमच्या अधिकाऱ्यामुळे पुण्याची ओळख अंमली पदार्थ अशी होत आहे. तुम्ही कारवाई केली नाही, तर आम्हांला रस्त्यावर उतरायला लागणार नाही. आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला.

दरम्यान, आम्ही या सगळ्यांबाबत आंदोलन करत आहोत.  पुण्यात कार अपघात प्रकरण नाही, तर राज्यातील इतर प्रश्नही अधिवेशन काळात ठोस भूमिका घेतल्या जातील. अजून कसले पुरावे देत आहे, आता तर २३ पब बार बाबत माहिती दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्याचे वाटोळे केले आहे  चरणसिंग राजपूत आणि शंभूराजे देसाई यांच्यात काय नाते आहे, ते मला कळत नाही, अशी टीका अंधारे यांनी केली.

 

Web Title: sushma andhare criticizes shambhuraj desai over pune pub and drugs issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.