Sushma Andhare: सुषमा अंधारेंचा नटी, बाई असा उल्लेख; गुलाबराव पाटलांविरोधात शिवसैनिक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 01:37 PM2022-11-06T13:37:57+5:302022-11-06T13:38:30+5:30

गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Sushma Andhare is called as Nati, Bai; Shiv Sainik aggressive against Gulabrao Patil in Jalgaon | Sushma Andhare: सुषमा अंधारेंचा नटी, बाई असा उल्लेख; गुलाबराव पाटलांविरोधात शिवसैनिक आक्रमक

Sushma Andhare: सुषमा अंधारेंचा नटी, बाई असा उल्लेख; गुलाबराव पाटलांविरोधात शिवसैनिक आक्रमक

googlenewsNext

- प्रशांत भदाणे
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंवर जहरी टीका केली होती. या विरोधात जळगावातले ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. 

गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवसैनिकांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धडक दिली आहेत. यासाठी शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे. 

गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ही महाप्रबोधन यात्रा नव्हे तर जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणारी यात्रा आहे. हे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहे. उरली सुरली शिवसेना डॅमेज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुषमा अंधारे यांना पाठवले आहे, असे प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले होते. यावेळी अंधारे यांच्यावर टीका करताना नटी, बाई असा उल्लेख केला होता. 

गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचा धसका घेतला आहे. पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून खोटे गुन्हे दाखल करत आहेत. मात्र आम्ही अशा गुन्ह्यांना भीक घालणार नाही. आम्हाला कोणतीही बंदी घातली तरी महाप्रबोधन यात्रा सुरूच राहील. या सरकारने माफिया आणि गुंडांना हाताशी धरले आहे, बहुजन असल्याने माझ्यावर कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता.

Web Title: Sushma Andhare is called as Nati, Bai; Shiv Sainik aggressive against Gulabrao Patil in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.