“मला नरडं आहे, त्यांना गळा...”; अमृता फडणवीसांच्या विधानावर सुषमा अंधारेंची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 04:08 PM2023-04-27T16:08:23+5:302023-04-27T16:08:50+5:30

Sushma Andhare News: अमृता फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाला सुषमा अंधारे यांनी खोचक शब्दांत उत्तर दिले आहे.

sushma andhare replied amruta fadnavis statement in interview | “मला नरडं आहे, त्यांना गळा...”; अमृता फडणवीसांच्या विधानावर सुषमा अंधारेंची खोचक टीका

“मला नरडं आहे, त्यांना गळा...”; अमृता फडणवीसांच्या विधानावर सुषमा अंधारेंची खोचक टीका

googlenewsNext

Sushma Andhare News: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यादेखील शिंदे गट आणि भाजपवर सातत्याने टीका करत असतात. मात्र, यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या विधानावर सुषमा अंधारे यांनी खोचक टीका केली आहे. 

एका मुलाखतीवेळी, सुषमा अंधारे या मला माझ्यासारख्या वाटायच्या. मनात असेल ते स्पष्ट बोलायच्या. त्या कुणाला घाबरायच्या नाहीत. जे आहे ते स्पष्टपणे बोलायच्या. मात्र, आता त्यांना जशी स्क्रीप्ट मिळते, तशा त्या बोलतात, असा टोला अमृता फडणवीस यांनी लगावला होता. यावर सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीत खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. 

मग काय साधर्म्य असेल आमच्यामध्ये?

अमृता वहिनींना मी त्यांच्यासारखे वाटते असं त्या जाहीरपणे एका मुलाखती दरम्यान म्हणाल्या. मी सतत विचार करत होते की मी त्यांना कोणत्या अँगलने त्यांच्यासारखी वाटत असेल बरं? ...कारण दिसायला तर त्या निश्चितपणे माझ्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. श्रीमंत ही आहेत. बाकी मला नरडं आहे त्यांना गळा आहे. मग काय साधर्म्य असेल आमच्यामध्ये?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी पोस्टमधून केला आहे. 

कदाचित भाषा प्रभुत्व हे दोघीतलं साम्य असेल का? 

"मग मला कधीतरी वाटलं की कदाचित भाषा प्रभुत्व हे दोघीतलं साम्य असेल का? पण छे! कालची मुलाखत आणि त्यातलं त्यांचं कॉन्टिनेन्टल उच्चारात मराठी ऐकलं अन् खात्री पटली की आमच्यात साम्य असे काहीच असु शकत नाही.", असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, "पण त्या ही पेक्षा मराठी मनाचे मानबिंदू असणारे, मराठी भाषेचे पाईक, मराठी वाचवा चा ध्यास घेणारे, वेळप्रसंगी मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ ची पुस्तके सुध्धा मराठीत व्हावीत यासाठी कृष्णकुंजचे रान हादरवणारे राजदादा यांना, मी बोल्ली, मला चान्स मिळाली, या टाईपच मराठी ऐकुन कानात शिसं ओतल्यासाखं झालं असेल...", असा टोला सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना लगावला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: sushma andhare replied amruta fadnavis statement in interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.