Sushma Andhare : बहिणीवर इतकं कुणी चिडतं का भाऊ? अशाने 'चिडका बिब्बा' नाव पडेल; अंधारेंचा फडणवीसांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 02:15 PM2022-12-28T14:15:39+5:302022-12-28T14:30:00+5:30
Sushma Andhare Slams BJP Devendra Fadnavis : सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या नेत्यांचे जुने व्हिडीओ ट्वीट केले आहेत. तसेच फडणवीसांनाही खोचक टोला लगावला आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) महाप्रबोधन यात्रेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधायला सुरुवात केली आहे. सुषमा अंधारेंच्या भाषणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अंधारे यांनी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (BJP Devendra Fadnavis) विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. आमच्या श्रीकृष्णाबद्दल तुमच्या नेत्या बोलतात, पण तुम्ही त्याबद्दल काहीही बोलत नाही. तुम्ही मूग गिळून बसलेले आहात, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना नेत्यांवर हल्लाबोल केला. यानंतर आता सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या नेत्यांचे जुने व्हिडीओ ट्वीट केले आहेत. तसेच फडणवीसांनाही खोचक टोला लगावला आहे. "देवेंद्रभाऊ वादाला तोंड फुटलेच आहे तर हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा. हे भाजपाचे लोक आहेत की परग्रहावरचे? आणि यावर आपलं नेमकं मत काय आहे? बाकी तुम्ही माझ्यावर हल्ला करण्याइतके अस्वस्थ झालेलं बघून आनंद वाटला" असं म्हणत टीकास्त्र सोडल आहे.
देवेंद्रभाऊ वादाला तोंड फुटलेच आहे तर हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा. हे भाजपाचे लोक आहेत की परग्रहावरचे? आणि यावर आपलं नेमकं मत काय आहे?
— SushmaTai Andhare (@andharesushama) December 27, 2022
बाकी तूम्ही माझ्यावर हल्ला करण्याइतके अस्वस्थ झालेलं बघुन आनंद वाटला. @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@OfficeofUT@AUThackeray@ShivsenaCommspic.twitter.com/4nJSmxKWSF
"बहिणीवर इतकं कुणी चिडतं का भाऊ?"
"बहिणीवर इतकं कुणी चिडतं का भाऊ? अशाने 'चिडका बिब्बा' नाव पडेल" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे य़ांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भाऊ शेवटचे दोनच प्रश्न. माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची सोडून तेरा वर्ष मागे जाऊन उत्खनन का केलं आणि करायचं उत्खनन तर तेरा वर्ष का वाट बघितली की तेव्हा मी शिवसेनेत नव्हते म्हणून भीती वाटली नाही. शेवटचा प्रश्न बहिणीवर इतकं कुणी चिडतं का भाऊ? अशाने #चिडका_बिब्बा नाव पडेल बरं" असं म्हटलं आहे.
"भाजपाच्याच 15 लोकांना clean chit कशी मिळाली?"
"भाऊ महाप्रबोधन यात्रेतून तुम्हाला महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार, असंघटित कामगार संबंधाने प्रश्न विचारते, भाजपाच्याच 15 लोकांना clean chit कशी मिळाली? Bjpचे सगळेच स्वच्छ कसे ज्यांच्यावर आरोप केले ते भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या चौकशी का थांबल्या? कित्ती साधे प्रश्न विचारले?" असं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
भाऊ शेवटचे दोनच प्रश्न.
माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची सोडून तेरा वर्ष मागे जाऊन उत्खनन का केलं आणि करायचं उत्खनन तर तेरा वर्ष का वाट बघितली की तेव्हा मी शिवसेनेत नव्हते म्हणून भीती वाटली नाही.
शेवटचा प्रश्न बहिणीवर इतकं कुणी चिडतं का भाऊ? अशाने #चिडका_बिब्बा नाव पडेल बरं— SushmaTai Andhare (@andharesushama) December 27, 2022
सुषमा अंधारेंनी फडणवीसांच्या आरोपांना सोलापुरातून प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस इतके अभ्यासू आहात, नाही नाही ते सर्व मुद्दे काढले होते. 13 वर्षे तुम्ही झोपला होतात का? आत्ता तुम्हाला हे सर्व सुचतंय का? तुम्हाला असं वाटतंय की, तुमच्या या जाळ्यात मी अडकेल, पण अजिबात नाही. यानंतरही मी चुकतेय असं वाटत असेल, तर मी पुन्हा एकदा सांगते की, भागवत संप्रदायाचा कुठलाही सच्चा वारकरी अजिबात अभद्र आणि अमंगल भाषा बोलत नाही. हे मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी आहेत, असे म्हणत सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर पलटवार केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"