संशयित माओवादी गोकराकोंडा साईबाबाने केले आत्मसमर्पण
By admin | Published: December 26, 2015 01:45 AM2015-12-26T01:45:00+5:302015-12-26T01:45:00+5:30
न्यायालयाकडून दोन दिवसांत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश मिळाल्यामुळे संशयित माओवादी डॉ. गोकराकोंडा नागा साईबाबा याने शुक्रवारी आत्मसमर्पण केले.
Next
नागपूर : न्यायालयाकडून दोन दिवसांत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश मिळाल्यामुळे संशयित माओवादी डॉ. गोकराकोंडा नागा साईबाबा याने शुक्रवारी आत्मसमर्पण केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी बुधवारी माओवादी डॉ. गोकराकोंडा नागा साईबाबाचा जामीन अर्ज फेटाळून त्याला दोन दिवसांत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी साईबाबा कारागृहात पोहचला. कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केल्यानंतर रात्री साईबाबाला कारागृहातील विशेष सेलमध्ये पाठवण्यात आले. (प्रतिनिधी)