पुण्यातून संशयित दहशतवाद्याला अटक; उत्तर भारतात हल्ला करण्याचा होता प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 10:20 PM2022-08-23T22:20:56+5:302022-08-23T22:21:16+5:30

उत्तर भारतात आगामी काळात होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) रॅलीवर देखील हल्ला करायचा असा प्लॅनही या दहशतवाद्यांनी बनवल्याचं समोर आले आहे

Suspected terrorist arrested from Pune; The plan was to attack North India | पुण्यातून संशयित दहशतवाद्याला अटक; उत्तर भारतात हल्ला करण्याचा होता प्लॅन

पुण्यातून संशयित दहशतवाद्याला अटक; उत्तर भारतात हल्ला करण्याचा होता प्लॅन

googlenewsNext

पुणे - राज्यात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या संशयास्पद बोटीनंतर राज्यातील पोलीस यंत्रणा अलर्टमोड आहे. त्यात पुण्यातून आज एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आल्यानं खळबळ माजली आहे. अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली, उत्तर प्रदेशातील प्रमुख व्यक्तींवर हल्ला करण्याचा प्लॅन रचत होते अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी मिळाली. 

संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे तीन व्यक्ती म्हणजे नरसिंहानंद सरस्वती, गायक संदीप आचार्य आणि जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी असं त्यांचे नाव होते. उत्तर भारतात आगामी काळात होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) रॅलीवर देखील हल्ला करायचा असा प्लॅनही या दहशतवाद्यांनी बनवल्याचं समोर आले आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यांसाठी लागणारं साहित्य आणि पैसे पाकिस्तानातील मास्टर माईंडकडून येणार होते. प्लॅननुसार जुनैद मोहम्मद आणि साथीदार निघण्याच्या तयारीत होते. तेव्हा राज्य दहशतवाद विरोधी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. जुनैद हा सोशल मीडियावर सक्रीय होता.जवळपास १७ हून अधिक बनावट प्रोफाईलच्या माध्यमातून तो इतरांशी संवाद साधत होता. 

Web Title: Suspected terrorist arrested from Pune; The plan was to attack North India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.