नाशिकच्या आमदाराला धमकी दिल्याचा संशय

By admin | Published: March 3, 2017 05:42 AM2017-03-03T05:42:15+5:302017-03-03T05:42:15+5:30

मुंबईच्या तीन आमदारांना अश्लील मेसेज पाठवून धमकाविणाऱ्या दीपककुमार गुप्ता (४०) याने नाशिकमधील एका आमदाराला धमकाविल्याची माहिती समोर येत आहे

Suspected threat to the MLA of Nashik | नाशिकच्या आमदाराला धमकी दिल्याचा संशय

नाशिकच्या आमदाराला धमकी दिल्याचा संशय

Next


मुंबई : नवी मुंबई, मुंबईच्या तीन आमदारांना अश्लील मेसेज पाठवून धमकाविणाऱ्या दीपककुमार गुप्ता (४०) याने नाशिकमधील एका आमदाराला धमकाविल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी नाशिक पोलीस जळगावमध्ये चौकशी केली होती. तर दुसरीकडे गुप्ता तपासात सहकार्य करत नसल्याने मुंबई पोलिसांच्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे त्याने आमदारांनाच लक्ष्य का केले? यामागचे गूढ अद्याम कायम आहे.
शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यासह नवी मुंबईच्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांना आलेल्या धमकी आणि अश्लील मेसेजप्रकरणी गुप्ताला विले पार्ले पोलिसांनी अटक केली. त्यापाठोपाठ २०१५मध्ये त्याला भाजपा आमदार अनिल गोटे यांना धमकाविल्याप्रकरणी धुळे पोलिसांनी अटक केली होती. गुप्ताने नाशिकमधील आणखी एका आमदाराच्या धमकी प्रकरणातही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार नाशिक पोलिसांनी गुरुवारी जळगावमध्ये चौकशी केली. मात्र अद्याप त्या आमदाराविषयीची माहिती समोर आलेली नाही.
विलेपार्ले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता तपासात सहकार्य करत नसल्यामुळे त्यांना अडचणी निर्माण होत आहे. त्याच्याकडील दोन सीम कार्ड असलेला मोबाइल ताब्यात घेण्यात आला आहे. त्याच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकानेच तो आमदारांना अश्लील आणि धमकीचे संदेश पाठवित असल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती विले पार्ले पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Suspected threat to the MLA of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.