परभणीतून अटक केलेल्या इसीसच्या संशयितांनी आरोप फेटाळले
By admin | Published: October 14, 2016 04:49 PM2016-10-14T16:49:02+5:302016-10-14T16:49:02+5:30
सुमारे तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र एटीएसने परभणी जिल्ह्यात कारवाई करून इसीसच्या संपर्कातील चार तरुणांना अटक केली होती.
Next
ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. १४ - सुमारे तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र एटीएसने परभणी जिल्ह्यात कारवाई करून इसीसच्या संपर्कातील चार तरुणांना अटक केली होती. हे चौघेही इसीसच्या इशाऱ्यावरून घातपात करण्याच्या तयारीत होते असा एटीएसचा आरोप आहे.
नुकतचं एटीएसने नांदेड न्यायालयात तब्बल छत्तीसशे पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर आज या चौघंही संशयितांना औरंगाबाद जेल मधून नांदेड न्यालयात हजार करण्यात आले. न्यायायाधीशानी या चौघांनी त्यांच्यावरील आरोप मान्य आहेत का अशी सुरुवातील विचारला केली.
पण चौघांनीही त्यांच्यावर ठेवण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी प्रक्रिया सुरु होणार आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी २६ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन न्यायालयात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.