आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आव्हाड निलंबित

By admin | Published: December 13, 2014 03:15 AM2014-12-13T03:15:22+5:302014-12-13T03:15:22+5:30

विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांना चालू अधिवेशन संपेर्पयत निलंबित करण्यात आले.

Suspend angered due to offensive statement | आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आव्हाड निलंबित

आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आव्हाड निलंबित

Next
नागपूर : विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांना चालू अधिवेशन संपेर्पयत निलंबित करण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मांडलेला निलंबनाचा प्रस्ताव  मंजूर करण्यात आला.
आव्हाड यांनी नाथुराम गोडसेचा जन्मदिवस साजरा करणा:यांवर कारवाई करण्याची मागणी केली असता, मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी त्यावर निवेदन केले. यावर आव्हाड पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करीत असताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता मध्येच बोलायला उठले. अध्यक्षांनी त्यांना बसण्यास सूचना केली असता महेता अध्यक्षांनाच ‘तुम्ही थांबा’, असे म्हणाले. हा अध्यक्षांचा अवमान असल्याचा मुद्दा पुढे करीत आव्हाडांसह विरोधी सदस्यांनी नारेबाजी केली. या वेळी महेता व छगन भुजबळ यांच्यात खटके उडाले. या गोंधळात मुख्यमंत्री बोलत असताना आव्हाडांनी जागेवर बसून आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे त्यांना निलंबित केले गेले. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सभात्याग केला. 

 

Web Title: Suspend angered due to offensive statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.