'‘त्या’ शेतकऱ्याला अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 02:42 AM2019-06-22T02:42:05+5:302019-06-22T02:42:21+5:30

विधान परिषद सभापतींचे निर्देश

Suspend a police officer who arrested the farmer. | '‘त्या’ शेतकऱ्याला अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा'

'‘त्या’ शेतकऱ्याला अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा'

Next

मुंबई : कर्जमाफीसह विविध मागण्यांवर आपली व्यथा मांडण्यासाठी विधिमंडळात दाखल झालेले नामदेव पतंगे आणि अशोक मनवर या शेतकऱ्यांना पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले. कोणताही गुन्हा केला नसताना शेतकºयांना अटक करणाºया पोलीस अधिकाºयाला तातडीने निलंबित करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.

राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेत अशोक मनवर या शेतकºयाचा समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र या शेतकºयाला अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. मध्यंतरी पतंगे यांनी शेतीसाठी किडनी विकण्याची सरकारकडे परवानगी मागितली होती, यामुळे ते चर्चेत आले होते. आपली व्यथा त्यांनी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे मांडल्यानंतर मुंडे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. संबंधित पोलीस अधिकाºयावर कारवाई करून शेतकºयांची सुटका करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. यावर सभापतींनी पोलीस अधिकाºयावर निलंबनाची कारवाई करून शेतकºयाची सुटका करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.

Web Title: Suspend a police officer who arrested the farmer.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.