अमळनेर न.पा.चे पाच कर्मचारी निलंबित

By admin | Published: May 11, 2014 12:44 AM2014-05-11T00:44:28+5:302014-05-11T00:44:28+5:30

कामात कुचराई करणार्‍या आणि मद्यपान करून कार्यालयात गोंधळ घालणार्‍या नगरपरिषदेच्या पाच कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

Suspended five employees of Amalner N.P. | अमळनेर न.पा.चे पाच कर्मचारी निलंबित

अमळनेर न.पा.चे पाच कर्मचारी निलंबित

Next

 अमळनेर : कामात कुचराई करणार्‍या आणि मद्यपान करून कार्यालयात गोंधळ घालणार्‍या नगरपरिषदेच्या पाच कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. यात चार सफाई कर्मचारी व एका वाहनचालकाचा समा0वेश आहे. मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांनी हे आदेश काढले आहेत. ‘लोकमत’ने शहरातील घाणीसंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. यासंदर्भात ३० एप्रिल रोजी कर्मचार्‍यांना नोटीस देऊनही त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली होती. नगरपरिषदेतील ट्रॅक्टर (एम.एच.१९, १३६) वरील कामगार रमेश वना बिºहाडे, चंद्रकांत भरत सोनटक्के, कडू बाबूराव बिºहाडे, गणेश गोरख सपकाळे यांनी वॉर्डातील कचरा भरला नाही. वरिष्ठांना अरेरावी करून आरडाओरड केली. ट्रॅक्टरचालक प्रकाश रमेश सोनवणे यांनी मद्यपान करून वरिष्ठांना अरेरावीची भाषा वापरली. या कारणांवरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. नगरपरिषदेत क्षमतेपेक्षा जादाचे सफाई कामगार असतानादेखील सर्वत्र साफसफाईची बोंब आहे. कामगारांच्या कामचुकारपणाबाबत काही मुकादम कामगारांचे खाडे करतात, तर काही मुकादमांचे नियंत्रणच नाही. त्यामुळे अस्वच्छतेला मुकादमदेखील तेवढेच जबाबदार आहेत. म्हणून बेजबाबदार मुकादमांवरही कारवाईची अपेक्षा आहे. (वार्ताहर)

Web Title: Suspended five employees of Amalner N.P.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.