निलंबित कारागृह अधीक्षकांना ९ सप्टेंबरपर्यंत दिलासा

By admin | Published: September 4, 2016 12:53 AM2016-09-04T00:53:51+5:302016-09-04T00:53:51+5:30

महिला क ॉन्स्टेबलचा विनयभंग केल्याप्रकरणी निलंबित झालेले ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांना दिलासा मिळाला आहे.

Suspended prison superintendents will be deployed till 9th ​​September | निलंबित कारागृह अधीक्षकांना ९ सप्टेंबरपर्यंत दिलासा

निलंबित कारागृह अधीक्षकांना ९ सप्टेंबरपर्यंत दिलासा

Next

ठाणे : महिला क ॉन्स्टेबलचा विनयभंग केल्याप्रकरणी निलंबित झालेले ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांना दिलासा मिळाला आहे.
जाधव यांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून केलेल्या अर्जावर झालेल्या सुनावणीत त्यांना ९ सप्टेंबरपर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे. त्यांच्याविरोधात ३१ आॅगस्ट रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी अटकपूर्व जामीन मिळावा, म्हणून ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एम. वली मोहम्मद यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. त्या वेळी वकिलांनी त्यांची बाजू मांडली. त्यानुसार, त्यांना अंतरिम जामीन मिळाल्याने ९ सप्टेंबरपर्यंत दिलासा मिळाला आहे. तर, ९ सप्टेंबर रोजी पोलीस याप्रकरणी आपली बाजू मांडणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Suspended prison superintendents will be deployed till 9th ​​September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.