Vidhan Parishad Result: 'मविआ'ला मोठा धक्का? दहाव्या जागेसाठी सस्पेन्स, ३ उमेदवारांची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 09:37 PM2022-06-20T21:37:08+5:302022-06-20T22:16:53+5:30

या निवडणुकीत भाजपाचे चार उमेदवार जिंकले असून महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, शिवसेनेचे दोन्हीही उमेदवार जिंकले.

Suspense for Congress-BJP candidate for 10th seat in vidhan parishad election | Vidhan Parishad Result: 'मविआ'ला मोठा धक्का? दहाव्या जागेसाठी सस्पेन्स, ३ उमेदवारांची धाकधूक वाढली

Vidhan Parishad Result: 'मविआ'ला मोठा धक्का? दहाव्या जागेसाठी सस्पेन्स, ३ उमेदवारांची धाकधूक वाढली

googlenewsNext

मुंबई - विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत २ मते बाद झाल्यानंतर २८३ मते वैध ठरवण्यात आली. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या फेरीत भाजपाचे ४, शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ उमेदवार निवडून आले. त्यानंतर या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीत भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची १७ मते मिळाली तर भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची २० मते मिळाली. 

या निवडणुकीत भाजपा ४ उमेदवार पहिल्या पसंतीच्या फेरीत जिंकले तर काँग्रेसचे दोन्ही उमेदवारांबाबत सस्पेन्स कायम आहे. दहाव्या जागेसाठी धाकधूक वाढली आहे. या निवडणुकीत पहिल्या पसंतीत एकनाथ खडसे - २९, सचिन आहिर - २६. आमश्या पाडवी - २६, श्रीकांत भारतीय - ३०, प्रविण दरेकर - २९, राम शिंदे - ३०, उमा खापरे - २७, प्रसाद लाड - १७ रामराजे नाईक निंबाळकर - २८ मते पडली. 

काँग्रेसचा आक्षेप, मतमोजणीला विलंब
विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान झाले. एकूण २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांनी मतदान केले. तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांना हायकोर्टाने मतदानाची परवानगी नाकारली तर शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाले आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी काँग्रेसनं भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. जगताप, मुक्ता टिळक यांनी मदतनीसाच्या माध्यमातून हे मत दिले असा आक्षेप काँग्रेसनं घेतला. त्यासाठी काँग्रेसनं राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांसह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे विधान परिषदेच्या मतमोजणीला विलंब झाला. 

निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळला
भाजपाचे पाचही उमेदवार निवडून येतील याची खात्री आहे असा दावा भाजपा नेते करत होते. काँग्रेसचे आक्षेप राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवत मतमोजणीला सुरुवात करण्याचे आदेश दिले. सुकृतदर्शनी आक्षेप योग्य नसल्याने मतमोजणीला सुरुवात करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असेल असं भाजपाचे आमदार राहूल नार्वेकर यांनी सांगितलं. 

Web Title: Suspense for Congress-BJP candidate for 10th seat in vidhan parishad election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.