संपात सहभागी झालेल्या सोलापूरच्या ११२ निवासी डॉक्टरांचे निलंबन
By admin | Published: March 22, 2017 05:28 PM2017-03-22T17:28:07+5:302017-03-22T17:28:07+5:30
राजाराम पोवार: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई
संपात सहभागी झालेल्या सोलापूरच्या ११२ निवासी डॉक्टरांचे निलंबन
राजाराम पोवार: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई
सोलापूर: डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध म्हणून राज्यभरातील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. सोलापूरच्या डॉ. वैशंपायन वैद्यकीय महािवद्यालयाच्या डॉक्टरांचाही यात सहभाग आहे. संबंधितांना नोटिसा बजावूनही ते हजर राहिले नसल्याने अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी ११२ जणांवर निलंबनाची कारवाई केली. उच्न न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई केल्याने त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील डॉक्टरांवर होणारे वाढते हल्ले रोखण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना होत नसल्याचे कारणावरुन आणि आठवड्यात धुळे, नाशिक, सायन, औरंगाबाद येथे अशा घडल्याने निवासी डॉक्टरांनी संप सुरु केला आहे. याचे थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याने संबंधितांना संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महािवद्यालय तथा छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचेअधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना मंगळवारी सकाळी आणि त्यानंतर मध्यरात्री १२ वाजता संप मागे घेऊन सेवेत सहभागी होण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. त्याची दखल न घेतल्याने अधिष्ठाता यांनी आज (बुधवारी) ११२ जणांवर निलंबनाची कारवाई केली.
सोलापूच्या शासकीय रुग्णालयात एकूण १७७ निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. यापैकी ११२ जणांनी संपामध्ये सहभाग घेतला होता. अन्य ६५ निवासी डॉक्टर रुग्णसेवेसाठी कार्यरत आहेत. रुग्णालयातील दररोज हजााहून अधिक रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात उपचार घेण्यासाठी वर्दळ असते. त्या दृष्टीने रुग्णांची गैरसोय होऊ यासाठी संप करता येणार नाही, असे उच्च न्यायालयाचे निर्देश असताना डॉक्टर संपावर गेल्याने शासकीय रुग्णालयाकडून ही कारवाई करण्यात आल्याचे डॉ, पोवार यांनी स्पष्ट केले.
------------------
रुग्णालय प्रशासनाचे नियोजन
दरम्यान, शासकीय रुग्णालयातील रुग्णांवर या संपाचा परिणाम होऊ नये यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील पूुर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, सहा प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, कार्यरत असलेले ६५ निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने नियोजन आखले आहे. रुग्णांना वेळेवर उपचार सुरु आहेत. सर्वांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. जिल्ह्यातील व महापालिका क्षेत्रातील तातडीचे रुग्ण वगळता सामान्य रुग्णांना शासकीय रुग्णालयाकडे पाठवू नये अशा सूचना दिल्या आहेत, असे अधिष्ठाता पोवार यांनी स्पष्ट केले.
----------------------------
काय होणार पुढील कारवाई
निलंबवाची कारवाई केलेल्या डॉक्टरांवर पुढील टप्पा म्हणून त्यांचे रजिस्ट्रेन रद्द, मानधन न देणे अशी कारवाईचे पाऊस शासनाकडून उचलले जाऊ शकते असेही सांगण्यात आले.