आरोपीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी 5 पोलिसांचे निलंबन

By Admin | Published: January 27, 2017 01:23 PM2017-01-27T13:23:53+5:302017-01-27T14:35:40+5:30

पोलिसांच्या गाडीतून उडी मारल्याने संशयित आरोपी राहुल गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र राहुलचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Suspension of 5 policemen on suspicious death of accused | आरोपीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी 5 पोलिसांचे निलंबन

आरोपीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी 5 पोलिसांचे निलंबन

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 27 -  पोलिसांच्या गाडीतून उडी मारल्याने संशयित आरोपी राहुल गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र राहुलचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. 
 
राहुलच्या नातेवाईकांनी घाटी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत पोलिसांना शिवीगाळही केली. जोपर्यंत पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी मागणी राहुलच्या कुटुंबीयांनी केली आहे. 
 
दरम्यान, याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात 2 हेड कॉन्स्टेबल, 3 कॉन्स्टेबलचा समावेश आहे.
 
आणखी बातम्या

Web Title: Suspension of 5 policemen on suspicious death of accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.