जयंत पाटील यांच्यावर केवळ द्वेषापोटी निलंबनाची कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेसचा निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 06:09 PM2022-12-22T18:09:27+5:302022-12-22T18:20:06+5:30

आज हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी  सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून घटना घडली आहे, असे रविकांत वरपे म्हणाले.

Suspension action against Jayant Patil just because of hatred, target of NCP | जयंत पाटील यांच्यावर केवळ द्वेषापोटी निलंबनाची कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेसचा निशाणा 

जयंत पाटील यांच्यावर केवळ द्वेषापोटी निलंबनाची कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेसचा निशाणा 

googlenewsNext

मुंबई : विधानसभा अध्यक्षांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. 

आज हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी  सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून घटना घडली आहे, असे रविकांत वरपे म्हणाले. तसेच, महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील सुसंस्कृत राजकारणी, अभ्यासू,संयमी नेते म्हणून ओळखले जातात. ज्यांची मागणी होती की सभागृहात लोकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात यावी, मात्र आज विधानसभेच्या कामकाजात दिशा सालियानच्या विषयावर बदनामी करू नका अशी तिच्या आई- वडिलांची इच्छा असूनही सत्ताधारी पक्षाचे १४ लोकप्रतिनिधी बोलतात. मात्र विरोधी पक्षाच्या एकच लोकप्रतिनिधीला बोलू दिले जात नाही. हा विरोधी पक्षावर अन्याय आहे, असे रविकांत वरपे यांनी सांगितले.
 
याचबरोबर, सत्ताधारी पक्ष सत्तेत असताना देखील विधानसभेत आंदोलन करतात. यासाठी विधानसभेचे कामकाज ५ वेळा तहकूब केले जाते. या सरकारच्या कामकाजा विरोधात जयंत पाटील यांनी आवाज उठवला. त्यांनी कुठलाही असंसदीय शब्द वापरला नाही. पंरतु केवळ द्वेषापोटी या हुकुमशाही शिंदे-फडणवीस सरकारने जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. याचा निषेध करतो. मात्र जयंत पाटील यांच्या मागे संपूर्ण राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष उभा असून या हुकुमशाही सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले जाईल, असेही रविकांत वरपे म्हणाले. 

Web Title: Suspension action against Jayant Patil just because of hatred, target of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.