बुधवारी सकाळपर्यंत कामावर हजर न झाल्यास होणार निलंबनाची कारवाई, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 11:40 PM2017-10-17T23:40:53+5:302017-10-17T23:41:47+5:30

बुधवारी म्हणजेच उद्या सकाळपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू न झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य सरकारनं दिला आहे.

Suspension of action will be taken, if the absence of work till the morning, government warnings to ST workers | बुधवारी सकाळपर्यंत कामावर हजर न झाल्यास होणार निलंबनाची कारवाई, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचा इशारा

बुधवारी सकाळपर्यंत कामावर हजर न झाल्यास होणार निलंबनाची कारवाई, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचा इशारा

Next

मुंबई- बुधवारी म्हणजेच उद्या सकाळपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू न झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य सरकारनं दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एसटी कर्मचारी कामावर हजर न झाल्यास त्यांच्या बदली कंत्राटी कामगारांची नेमणूक करण्यात येणार असल्याचेही राज्य परिवहन विभागाने सांगितलं आहे. 

एसटी कर्मचार्‍यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेदमुत संपाचे हत्यार उपसण्यात आले. ऐन दिवाळीत एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. 

एसटी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्यावतीने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आश्‍वासनांच्या पलीकडे शासन ठोस निर्णय घेत नसल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना सतत निवेदने देऊनही कर्मचार्‍यांच्या मुद्यावर तोडगा निघत नसल्याचे पाहून बेमुदत संपाचा बिगुल फुंकण्यात येत असल्याचे इंटक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल गरड यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी १६ ऑक्टोबरची तारीख निश्‍चित करण्यात आली. 

Web Title: Suspension of action will be taken, if the absence of work till the morning, government warnings to ST workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.