टेट्रा पॅकमधील मद्यबंदीस स्थगिती?

By admin | Published: March 31, 2016 01:57 AM2016-03-31T01:57:08+5:302016-03-31T01:57:08+5:30

देशी, विदेशी मद्य प्लास्टिकची बाटली व टेट्रा पॅकमध्ये विकण्यास १ एप्रिलपासून बंदी घालण्यात येणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात काढलेल्या अधिसूचनेवर अंतरिम स्थगिती

Suspension of alcohol in Tetra Pak? | टेट्रा पॅकमधील मद्यबंदीस स्थगिती?

टेट्रा पॅकमधील मद्यबंदीस स्थगिती?

Next

मुंबई : देशी, विदेशी मद्य प्लास्टिकची बाटली व टेट्रा पॅकमध्ये विकण्यास १ एप्रिलपासून बंदी घालण्यात येणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात काढलेल्या अधिसूचनेवर अंतरिम स्थगिती देण्याच्या विचारात उच्च न्यायालय आहे. मात्र तत्पूर्वी वापरलेल्या बाटल्या पुन्हा वापरण्यात येणार नाहीत, याची हमी प्लास्टिक व काचेच्या बाटल्या उत्पादकांना उच्च न्यायालयाला द्यावी लागणार आहे.
प्लास्टिकची बाटली आणि टेट्रा पॅकचे वेष्टन असलेले मद्य मानवी शरीरास अपायकारक आहे व राज्य सरकारच्या महसुलामध्ये घट होत असल्याने राज्य सरकारने देशी, विदेशी मद्य काचेच्या बाटलीत विकणे बंधनकारक केले आहे. १ एप्रिलपासून देशी, विदेशी मद्य प्लास्टिकची बाटली व टेट्रा पॅकमध्ये विकण्यावर सरकारने बंदी घातली आहे. याबाबत सरकारने अधिसूचनाही काढली आहे.
या अधिसूचनेला प्लास्टिक व काचेच्या बाटल्या उत्पादकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. डी. एच. वाघेला व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.
सुनावणीवेळी खंडपीठाने या अधिसूचनेला अंतरिम स्थगिती देऊ, असे म्हटले, यासंबंधी गुरुवारी आदेश देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suspension of alcohol in Tetra Pak?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.