निवडणूक कामात हलगर्जी केल्यास निलंबन - सहारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2017 01:59 AM2017-04-27T01:59:28+5:302017-04-27T01:59:28+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात हलगर्जीपणा करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिले आहेत.

Suspension of all India Elections - Saharia | निवडणूक कामात हलगर्जी केल्यास निलंबन - सहारिया

निवडणूक कामात हलगर्जी केल्यास निलंबन - सहारिया

Next

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात हलगर्जीपणा करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिले आहेत.
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्पतेमुळेच निवडणुका पार पाडणे शक्य होते; परंतु काही अपवादात्मक कर्मचारी व अधिकारी कर्तव्यात कसूर करतात. त्यांची गय केली जाणार नाही. सध्या भिवंडी- निजामूपर, मालेगाव आणि पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी आवश्यक तेवढे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त उपलब्ध करून देतात; परंतु पनवेल व भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अद्याप आवश्यक तेवढे निवडणूक निर्णय अधिकारी रूज झालेले नाहीत, ही बाब गंभीर आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. संबंधित अधिकारी गुरुवारी रूजू न झाल्यास त्यांना त्वरीत निलंबित करावे व प्रशासकीय कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Suspension of all India Elections - Saharia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.