कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला स्थगिती

By admin | Published: July 27, 2016 04:18 PM2016-07-27T16:18:48+5:302016-07-27T16:18:48+5:30

हद्दवाढी विरोधात कोल्हापूरच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ ही अन्यायकारक असल्याने ती त्वरीत रद्द करावी.

Suspension to the extent of Kolhapur Municipal Corporation | कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला स्थगिती

कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला स्थगिती

Next

ऑलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २७  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढी विरोधात कोल्हापूरच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ ही अन्यायकारक असल्याने ती त्वरीत रद्द करावी.

या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निषेधाचे फलक हातात घेऊन घोषणा दिल्या. या मध्ये चंद्रदीप नरके (आमदार, शिवसेना),अमल महाडीक (आमदार, भाजप)  सुजीत मिणचेकर (आमदार, शिवसेना) यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला स्थगिती दिली आहे.  ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊनच हद्दवाढीचा निर्णय घेणार असल्याचे या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Suspension to the extent of Kolhapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.