जिया खान खटल्याला ७ जूनपर्यंत स्थगिती
By admin | Published: May 24, 2016 03:06 AM2016-05-24T03:06:38+5:302016-05-24T03:06:38+5:30
बॉलीवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या खटल्याला उच्च न्यायालयाने सोमवारी ७ जूनपर्यंत स्थगिती दिली. जिया खानला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप बॉलीवूड
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या खटल्याला उच्च न्यायालयाने सोमवारी ७ जूनपर्यंत स्थगिती दिली. जिया खानला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप बॉलीवूड अभिनेता सूरज पांचोलीवर ठेवण्यात आला आहे.
जिया खानने आत्महत्या केली नसून सूरज पांचोलीने तिची हत्या केल्याचा संशय तिची आई राबिया खान यांना आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाने (एसआयटी) करावा. तसेच एफबीआयचे सहकार्य घ्यावे, यासाठी राबिया खान यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी राबिया यांनी पांचोलीवर आरोप निश्चित करण्यात येऊ नयेत, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही मागणी मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे राबिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही दिलासा देण्यास नकार देत उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी, असे निर्देश दिले. राबिया यांनी खटल्याला स्थगितीसाठी उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपीठापुढे याचिका केली होती.