लोढा समुहाला ठोठावलेल्या दंडाच्या आदेशाला स्थगिती
By Admin | Published: May 6, 2017 03:29 AM2017-05-06T03:29:57+5:302017-05-06T03:29:57+5:30
भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या लोढा समुहाला वडाळा येथील भूखंडावरील मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या लोढा समुहाला वडाळा येथील भूखंडावरील मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी मुद्रांक व नोंदणी विभागाने ४७३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मुद्रांक व नोंदणी विभागाने दिलेल्या या आदेशाला उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. मुद्रांक शुल्कापोटी मूळ रक्कम दोन महिन्यांनी भरण्याचे आदेश देत न्यायालयाने लोढा समुहाला याविरोधात सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागण्याची मुभा दिली.
वडाळा येथे लोढा समुहाच्या ९.९६ लाख चौरस फुटांच्या भूखंडावर निवासी तसेच व्यापारी वसाहतीचा ‘न्यू कफ परेड’ प्रकल्प सुरू आहे. या भूखंडाप्रकरणी मुद्रांक शुल्क न भरल्याबाबत मुद्रांक व नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांनी लोढा समुहाला दोषी ठरवत ४७३ कोटीचा दंड ठोठावला.