पोलीस युनियनच्या मागणीला स्थगिती

By admin | Published: April 1, 2016 01:50 AM2016-04-01T01:50:57+5:302016-04-01T01:50:57+5:30

पोलिसांची युनियन व्हावी म्हणून गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळापासून उपोषणास बसलेल्या पोलीस पत्नी यशश्री पाटील यांनी प्रमुख मागणीला स्थगिती देण्याची घोषणा केली.

Suspension of Police Union's demand | पोलीस युनियनच्या मागणीला स्थगिती

पोलीस युनियनच्या मागणीला स्थगिती

Next

मुंबई : पोलिसांची युनियन व्हावी म्हणून गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळापासून उपोषणास बसलेल्या पोलीस पत्नी यशश्री पाटील यांनी प्रमुख मागणीला स्थगिती देण्याची घोषणा केली. मात्र पोलिसांच्या इतर मागण्यांसाठी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दीर्घकाळ उपोषणामुळे बुधवारी पाटील यांची प्रकृती खालावली होती. यावेळी त्यांना तपासणीसाठी आझाद मैदानात आलेल्या डॉक्टरांकडून उपचार घेण्यासही पाटील यांनी नकार दिला. अन्न, नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट आणि गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पोलिसांची युनियन करण्याची मागणी न करण्याची अट त्यांनी घातली होती.(प्रतिनिधी)

काय आहेत मागण्या?
पोलीस अमंलदारांवर सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती समितीमुळे झालेला अन्याय दूर करावा. मागील १० वर्षांची फरकाची रक्कम रोखीने द्यावी.
२००३ ते २००५ सालामध्ये भरती झालेल्या पोलिसांना नाशिक, पुणे शहर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातील पोलिसांप्रमाणे वेतनवाढ दिलेली आहे. त्याप्रमाणाचे मुंबईतील अंमलदारांना देण्यात यावी.
मुंबई पोलिसांच्या वेतनात अन्य राज्यांप्रमाणे वाढ करावी.
पुरूष पोलिसांना पाल्याचे संगोपन करण्यासाठी ४५ दिवसांची रजा द्यावी.
महिला पोलिसांना स्वतंत्र प्रसाधन गृहांची सोय करावी.

Web Title: Suspension of Police Union's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.