शालेय शिक्षण विभागाच्या पटसंख्या जीआरला स्थगिती

By admin | Published: June 26, 2014 02:44 AM2014-06-26T02:44:19+5:302014-06-26T02:44:19+5:30

माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येच्या 2क् नोव्हेंबर 2क्13च्या शासन निर्णयाला (जीआर) बुधवारी शासनाने स्थगिती दिली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली.

Suspension of School Education Department's Chhattisgarh GR | शालेय शिक्षण विभागाच्या पटसंख्या जीआरला स्थगिती

शालेय शिक्षण विभागाच्या पटसंख्या जीआरला स्थगिती

Next
>शिक्षक अतिरिक्त ठरण्याच्या चर्चेला पूर्णविराम
मुंबई : माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येच्या 2क् नोव्हेंबर 2क्13च्या शासन निर्णयाला (जीआर) बुधवारी शासनाने स्थगिती दिली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली. त्यामुळे या शाळांमधील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 
आ. विक्रम काळे, आ. कपिल पाटील आणि आ. डॉ. सुधीर तांबे यांनी बुधवारी दर्डा यांची मंत्रलयात भेट घेऊन या जीआरला स्थगिती देण्याची आणि नोव्हेंबर 2क्12चा जीआर लागू ठेवण्याची मागणी केली. आ. रामनाथ मोते यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत ही मागणी केली होती.  (विशेष प्रतिनिधी)
 
शासन निर्णयात सुधारणा व अधिक स्पष्टता येण्याच्या दृष्टीने शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त होईर्पयत 2क् नोव्हेंबर 13च्या शासन निर्णयास स्थगिती देण्यात आली आहे.

Web Title: Suspension of School Education Department's Chhattisgarh GR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.