एसटी वाहकांच्या अपहार परिपत्रकाला स्थगिती

By admin | Published: October 27, 2016 04:18 AM2016-10-27T04:18:18+5:302016-10-27T04:18:18+5:30

एसटी वाहकांकडून अपहार केल्याने वर्षाला मोठ्या प्रमाणात महसुल बुडतो. त्यामुळे अपहार करणाऱ्या वाहकांना चाप बसावा यासाठी वाहकांना अंतर्भुुत रक्कमेच्या ५00 ते ७५0

Suspension of ST carrier's passage of circular | एसटी वाहकांच्या अपहार परिपत्रकाला स्थगिती

एसटी वाहकांच्या अपहार परिपत्रकाला स्थगिती

Next

मुंबई : एसटी वाहकांकडून अपहार केल्याने वर्षाला मोठ्या प्रमाणात महसुल बुडतो. त्यामुळे अपहार करणाऱ्या वाहकांना चाप बसावा यासाठी वाहकांना अंतर्भुुत रक्कमेच्या ५00 ते ७५0 पट दंड वसुल करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. त्याच्या अंमलबजावणीसाठी ६ आॅगस्ट २0१६ रोजी परिपत्रक काढण्यात आले.त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाल्यानंतर वाहकांनी या परिपत्रकाबाबत नाराजी व्यक्त करत विरोध केला.
वाहकांचा विरोध पाहून काढण्यात आलेल्या परिपत्रकाला परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी अखेर बुधवारी स्थगिती दिली. तिकीटांची पुर्नविक्री करणे, कमी दराची तिकीटे देणे, अनियमित तिकीटे देणे, प्रवासभाडे वसुल करुन तिकीट देणे, प्रवासभाडे वसुल न करणे व तिकीट न देणे इत्यादी प्रकारे एसटी वाहकांकडून अपहार केला जातो. त्याबाबतचा तक्रारी प्रवाशांकडूनही एसटीकडे करण्यात येतात. त्याचप्रमाणे अपहार होत असल्याचे एसटी अधिकाऱ्यांच्याही बाब निदर्शनास आली. अपहार होत असल्याने मोठा महसुल बुडत असल्याचे लक्षात येताच त्याबाबतचे एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभाग आणि वाहतूक विभागाकडून सर्वेक्षणही करण्यात आले. या सर्वेक्षणात वाहकांकडून करण्यात येत असलेल्या अपहारामुळे वर्षाला तब्बल ५00 कोटींचा महसुल बुडत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणात काहीवेळेला वाहकांना निलंबितही केले जाते. त्यातून अपहाराची रक्कम मात्र फारशी काही वसुल होत नाही. त्यामुळे अपहाराचे प्रकार थांबावे,महसुलही मिळावा आणि अपहाराची प्रकरणे लवकरात लवकर निकाली निघावी यासाठी एसटी महामंडळाने अपहार करणाऱ्या वाहकांवर निलंबन कारवाई ऐवजी तडजोडीची व मोठ्या दंडाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. (प्रतिनिधी)

या अन्यायकारक परिपत्रकास स्थगिती देण्यात आली. या परिपत्रकानंतर आंदोलनाचा पवित्रा घेऊन लेखी पत्र प्रशासनाला दिले होते. कामगारांच्या एकजुटीचा हा विजय आहे.
- संदीप शिंदे, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना- अध्यक्ष

या निर्णयामुळे वाहकांना न्याय मिळाला आहे. दिवाळीनिमित्ताने वाहकांसाठी हा चांगला निर्णय आहे.
- शिवाजीराव चव्हाण, महाराष्ट्र एसटी कामगार सेना-कार्याध्यक्ष

कामगारांच्या विरोधामुळे या परिपत्रकाला स्थगिती देण्यात आली. हा सर्व कामगारांचा विजय असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
- श्रीरंग बरगे, एसटी कर्मचारी काँग्रेस-सरचिटणीस

Web Title: Suspension of ST carrier's passage of circular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.