एका 'सिगार'ने 'चिंगारी'चे काम केल्याचा संशय
By admin | Published: June 3, 2016 07:54 PM2016-06-03T19:54:04+5:302016-06-03T19:54:04+5:30
पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारातील आग व नंतर बॉम्बस्फोटाला ‘सिगार’ कारणीभूत असल्याचा संशय काही सूत्राकडून वर्तविला जात आहे. या स्फोटाची ‘कोर्ट आॅफ इक्वॉयरी’ सुरू असून
- राजेश भोजेकर,
वर्धा, दि. 3 - पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारातील आग व नंतर बॉम्बस्फोटाला ‘सिगार’ कारणीभूत असल्याचा संशय काही सूत्राकडून वर्तविला जात आहे. या स्फोटाची ‘कोर्ट आॅफ इक्वॉयरी’ सुरू असून देशभरातील तपास यंत्रणाही कामाला लागलेल्या आहेत. या यंत्रणेने या दिशेने तपास केल्यास या बाबीचा उगलडा होऊ शकतो, असेही बोलले जात आहे.
पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारात सोमवारी मध्यरात्री शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. हा बॉम्बस्फोट होण्यापूर्वी आग लागली असे प्राथमिक कारण आतापर्यंत पुढे करण्यात आले आहे. मग ही आग कशामुळे लागली, याचे कारण शोधणेही तेवढेच गरजेचे आहे. आग रात्रीला ११ अचानक आग लागल्याचे माहिती झाले आणि लष्करी यंत्रणा कामाला लागली. वास्तविक, आगीचे हे रुप धारण करण्यापूर्वी ती काही तासांपूर्वीपासून धुमसत असावी, असाही संशय व्यक्त केल्या जात आहे. मग आगीची नेमकी सुरूवात कुठून आणि केव्हा झाली, ही बाबही तेवढीच महत्त्वाची ठरणारी आहे.