किंंजलवर बलात्कार झाल्याचा दाट संशय

By Admin | Published: July 23, 2016 03:07 AM2016-07-23T03:07:23+5:302016-07-23T03:07:23+5:30

विरार येथील किंंजल शहा हत्येचे गूढ अद्याप गुलदस्त्यात असून तिच्या प्रियकराने अमानवी बलात्कार केल्याचा संशय आहे.

The suspicion of Kunjal being raped | किंंजलवर बलात्कार झाल्याचा दाट संशय

किंंजलवर बलात्कार झाल्याचा दाट संशय

googlenewsNext


वसई : विरार येथील किंंजल शहा हत्येचे गूढ अद्याप गुलदस्त्यात असून तिच्या प्रियकराने अमानवी बलात्कार केल्याचा संशय आहे. मात्र, त्याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खुलासा होणार आहे. दुसरीकडे, तिला तुंगारेश्वर येथील डोहात बुडवून मारण्याचाही प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, हत्येमागील गुंता वाढत चालल्याने पोलिसांनी गूढ उकलण्यासाठी आरोपीला घेऊन प्रात्यक्षिक करणार आहे.
विरारच्या बोळिंज येथे राहणाऱ्या किंंजलचे तिचा प्रियकर देवेंद्र भोसलेने संशयावरून हत्या केली होती. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर त्याने आपल्या वडिलांना सांगितले होते. त्यानंतर वडिलांनी त्याला घरात बंद करून पोलिसांना बोलावून देवेंद्रला पोलिसांच्या हवाली केले होते. त्याच्या अटकेनंतर त्याने पोलिसांना एकामागून एक चक्रावून टाकणारी माहिती दिली आहे. त्यामुळे किंंजलची हत्या अमानुषपणे केल्याचे उजेडात येत आहे. मात्र, यात देवेंद्रला कुणीतरी मदत केल्याचाही पोलिसांना संशय आहे. तसेच देवेंद्रने तिच्यावर बलात्कार तसेच अनैर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचेही तपासात समोर आले आहे. मात्र, हा प्रकार किंंजलच्या मृत्यू आधी की नंतर झाला याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, देवेंद्रने अमानवी कृत्य केल्याने मानसिक आणि शारिरीक आघात झाल्याने किंंजलचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपी देवेंद्र भोसले याने सोमवारी सुरुवातीला किंंजलला तुंगारेश्वर जंगलात नेले होते. त्याठिकाणी तिला डोहात बुडून मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे असलेल्या काही लोकांनी मध्यस्थी केली असता किंजल बेशुद्ध पडल्याचे निमित्त काढून देवेंद्रने तिला बेशुद्धावस्थेत रिक्षातून विरारला आणले होते. त्यानंतर बोळिंज येथे तिच्यावर शारीरिक अत्याचार करून तिची हत्या केली.
हा सर्व घटनाक्रम उलगडण्यासाठी अर्नाळा पोलीस सर्व घटनास्थळाचा क्राईम सिन करत आहेत. यामुळे आम्हाला नेमका गुन्हा कसा घडला किती वेळ लागला ते शोधायला मदत होणार आहे. (प्रतिनिधी)
तो रिक्षावाला या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार
किंंजल बेशुद्धावस्थेत असताना आरोपी देवेंद्रने तिला रिक्षात बसवून तुंगारेश्वर येथून विरारच्या बोळिंज येथे आणले. तो रिक्षावाला या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार ठरणार आहे. रिक्षात नेमके काय घडले हेसुद्धा स्पष्ट होणार आहे. किंंजलचा मृत्यू रिक्षात झाला की बोळिंजच्या घटनास्थळात ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. बोळिंजच्या लोकप्रभात कॉम्प्लेक्सच्या मागील निर्जन जागेत त्याने तिच्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. किंंजलवर नेमका लैंगिक अत्याचार ती बेशुद्ध असताना झाला की, मृत झाल्यावर याबाबत तपास सुरू असल्याचे पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका शारदा राऊत यांनी सांगितले. पोलीस या घटनेचे विविध पैलू तपासून पाहत आहेत. त्या दिवशी देवेंद्रसोबत अन्य कुणी होते का, त्याचाही पोलीस तपास करत आहेत. किंंजल आणि देवेंद्रचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु किंंजलचे अन्य तरुणासोबत संबंध असल्याचा देवेंद्रला संशय होता. त्यामुळे चिडलेल्या देवेंद्रने किंंजलचा खून केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: The suspicion of Kunjal being raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.