शिष्यवृत्ती योजनेत संशयास्पद व्यवहार
By admin | Published: August 6, 2015 01:07 AM2015-08-06T01:07:40+5:302015-08-06T01:07:40+5:30
आदिवासी विकास विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षण शिष्यवृत्तीत
नंदुरबार : आदिवासी विकास विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणासाठी देण्यात
येणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षण शिष्यवृत्तीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे यासाठी काही संस्थांना मंत्र्यानीच शिफारस दिल्याची बाब समोर आली असून त्याबाबत चौकशीची गरज व्यक्त होत आहे.
आदिवासी विकास विभागातर्फे न्युक्लिअस
बजेट योजेनअंतर्गत बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी खास शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र काही संस्थांनी यासंदर्भात
बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्तीची रक्कम हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तळोदा येथील प्रकल्पात लोकसंघर्ष मोर्चाने केलेल्या आंदोलनानंतर याबाबी समोर आल्या आहेत. या प्रकल्पात काही संस्थांना जवळपास १८ कोटी रुपयांचा निधी
देण्यात आला आहे. खोटी कागदपत्रे दाखवून
शिष्यवृत्ती लाटली जात आहे. अनेक संस्थांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने असे प्रकार केल्याचे संशयास्पद चित्र आहे, असा आरोप लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी केला.