अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 05:35 PM2023-03-13T17:35:12+5:302023-03-13T20:25:05+5:30

Bhagyashree Mote's Sister Death: मराठीतील आघाडीची अभिनेत्रा भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला आहे. भाग्यश्री मोटेची बहीण मधू मार्कंडेय हिचा मृतदेह पिंपरी चिंचवड येथील वाकड येथे सापडला आहे.

Suspicious death of actress Bhagyashree Mote's sister Madhu Markandeya, accident or accident? Police investigation started | अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू

अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू

googlenewsNext

मराठीतील आघाडीची अभिनेत्रा भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला आहे. भाग्यश्री मोटेची बहीण मधू मार्कंडेय हिचा मृतदेह पिंपरी चिंचवड येथील वाकड येथे सापडला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, बहिणीच्या आकस्मिक मृत्यूमुळे भाग्यश्री मोटे हिला धक्का बसला असून, तिने तिच्या मृत्यूची माहिती देताना सोशल मीडियावरून भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा मृतदेह वाकड येथे संशयास्पद स्थितीत सापडला होता. तिच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्याने संशय निर्माण झाला आहे. दरम्यान, मधु मार्कंडेय ही एक भाड्याने घर घेण्यासाठी एके ठिकाणी गेली होती. तिथे तिला चक्कर आल्याने ती खाली कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या काही नातेवाईकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. मात्र पोलिसांनी सध्यातरी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मधू मार्कंडेय ही भाग्यश्री मोटेची थोरली बहीण होती. तिच्या जाण्याने भाग्यश्रीला धक्का बसला आहे. तिने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. तुला मी कशी जाऊ देऊ? तू माझ्या असण्याचा भाग आहेस. शांत झोप आता. बाकी तुझी बाळ सांभाळून घेईल, अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Web Title: Suspicious death of actress Bhagyashree Mote's sister Madhu Markandeya, accident or accident? Police investigation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.