‘प्रॉपर्टी ब्रोकर’ चा संशयास्पद मृत्यू?

By admin | Published: March 11, 2016 03:09 AM2016-03-11T03:09:15+5:302016-03-11T03:09:15+5:30

आकोटचे प्रॉपर्टी ब्रोकर तथा हार्डवेअर व्यावसायिकाने घेतली फाशी; सातपुड्याच्या जंगलात आढळला मृतदेह.

Suspicious death of property broker? | ‘प्रॉपर्टी ब्रोकर’ चा संशयास्पद मृत्यू?

‘प्रॉपर्टी ब्रोकर’ चा संशयास्पद मृत्यू?

Next

आकोट (अकोला): आकोटचे प्रॉपर्टी ब्रोकर तथा हार्डवेअर व्यावसायिक अशोक रमेश म्हसाळ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. ही घटना सातपुडा जंगलातील आहाड नदीपात्रात घडली. घटनेमागचे कारण स्पष्ट झाले नसून, त्यांच्या मृत्यूबाबत शंका-कुशंका उपस्थित होत आहेत.
आकोट येथील अंबिकानगर परिसरातील रहिवासी अशोक रमेश म्हसाळ (४२) हे ९ मार्च रोजी दुपारच्या सुमारास जेवायला जातो, असे घरी सांगून गेले होते; परंतु सायंकाळपर्यंत परत न आल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात आला. दरम्यान, १0 मार्च रोजी सातपुड्यातील खटकाली बीट अंतर्गत आहाड नदीपात्रात एका इसमाने गळफास घेतल्याची माहिती समोर आली. त्यानुसार नातलग व मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. झाडावर लटकलेला मृतदेह हा अशोक म्हसाळ यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. चिखलदरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनास्थळी विषारी औषधीचा डबा, दोन मोबाइल फोन, खाण्याच्या वस्तू आदी साहित्य आढळून आले. त्याचप्रमाणे काही चिठ्ठय़ासुद्धा आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी चिखलदरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन आकोट ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.

*चर्चेला उधान
अशोक म्हसाळ हे शहरातील सर्वपरिचीत प्रॉपर्टी ब्रोकर व हार्डवेअर व्यावसायीक होते. अल्पावधीतच त्यांनी व्यवसायात जम बसविला होता. त्यांच्या आत्महत्येमुळे शहरात खळबळ उडाली असून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच खर्‍या कारणांचा उलगडा होईल असे पोलीसांनी सांगितले.

Web Title: Suspicious death of property broker?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.