‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणा-या तरुणीचा संशयास्पद मृत्यू
By admin | Published: June 23, 2017 11:50 PM2017-06-23T23:50:24+5:302017-06-23T23:50:24+5:30
विवाहित तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशन’ मध्ये राहणा-या कविता उर्फ पिंकी ठाकूर (वय २१) हिचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 23 - विवाहित तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणा-या कविता उर्फ पिंकी ठाकूर (वय २१) हिचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. तिचा मृत्यू संशयास्पद असल्याची शंका घेऊन कुटुंबीयांनी आरोप केल्यामुळे हे प्रकरण चिघळण्याचे संकेत मिळाले आहे.
एका शोरूममध्ये काम करणारी कविता आर्यन मिश्रा नामक तरुणासोबत राहत होती. आर्यन विवाहित आहे. कवितासोबत काही दिवसांपासून आर्यनचे मतभेद झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, राहत्या सदनिकेत शुक्रवारी दुपारी कविताचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. प्रारंभी तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून नंतर मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी कविताला मृत घोषित केले. तिच्या मृत्युचे वृत्त कळताच तिचे कुटुंबीय संतप्त झाले. त्यांनी आर्यनवर आरोप लावून कविताच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. त्यामुळे गिट्टीखदानचे ठाणेदार राजेंद्र निकम यांनी या प्रकरणात तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद करून डॉक्टरांना तातडीने अहवाल मागितला.
शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, त्यानंतर या प्रकरणात कारवाईचे स्वरूप ठरवू, अशी माहिती निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली. प्रक२ण लिव्ह इन रिलेशनशिपचे असल्याने पोलीस गंभीरपणे तपास करीत असल्याचेही निकम म्हणाले.