‘स्वाभिमान’ने दिली भाजपाला सोडचिठ्ठी,

By admin | Published: February 15, 2017 07:49 PM2017-02-15T19:49:52+5:302017-02-15T19:49:52+5:30

राज्यात विधानसभेला भाजपासोबत असलेले एकेक घटक पक्ष भाजपाची संगत सोडत

'Swabhiman' leaves BJP out, | ‘स्वाभिमान’ने दिली भाजपाला सोडचिठ्ठी,

‘स्वाभिमान’ने दिली भाजपाला सोडचिठ्ठी,

Next

नाशिक : राज्यात विधानसभेला भाजपासोबत असलेले एकेक घटक पक्ष भाजपाची संगत सोडत असून, काल बुधवारी (दि.१५) नाशिकला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक गट व एक गण वगळता जिल्हा परिषदेच्या ७२ गट व १४५ गणांसाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गोविंद पगार व हंसराज वडघुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वाभीमानी शेतकरी पक्षाचे सरकारातील मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरून पक्षाचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतूरा सुरू असतानाच स्वाभीमानीने शिवसेनेला जवळ करीत भाजपाला दणका दिला आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सरकारातील घटक पक्षांनी या निवडणूकीत भाजपाकडे काही जागा मागितल्या होत्या. त्या न दिल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याचा इशारा दिला होता. तथापि, भाजपाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने भाजपा विरूध्द स्वतंत्र भूमिका जाहिर करण्यात येईल असे, हंसराज वडघुले यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. दरम्यान, स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या निफाड तालुक्यातील देवगाव जिल्हा परिषद गटातून शिवनाथ जाधव व सिन्नर तालुक्यातील पांगरी गणातून रवींद्र पगार यांना उमेदवारी दिली आहे. हे दोन अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व गट व गणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पार्टीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप यावेळी गोविंद पगार व हंसराज वडघुले यांनी केला. भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भूमिका शेतकरी वर्गात आहे. वर्षभरात कांदा तसेच विविध भाजीपाला पिकांना मातीमोल भाव आहे.

Web Title: 'Swabhiman' leaves BJP out,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.